Home नाशिक मालेगांव तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था सौंदाणे चेअरमनपदी किशोर पवार , तर व्हा....

मालेगांव तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था सौंदाणे चेअरमनपदी किशोर पवार , तर व्हा. चेअरमनपदी संदीप दुकळे

185
0

आशाताई बच्छाव

IMG-20230619-WA0066.jpg

मालेगांव तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था सौंदाणे चेअरमनपदी किशोर पवार , तर व्हा. चेअरमनपदी संदीप दुकळे

सौंदाणे-काकासाहेब सांळुके प्रतिनिधी युवा मराठा न्युज-

नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांची अग्रगण्य समजली जाणारी मालेगाव तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित सौंदाणेच्या चेअरमन पदी किशोर पवार यांची तर व्हा. चेअरमनपदी संदीप दुकळे यांचा प्रत्यकी एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदर पतसंस्थेचे कार्यक्षेत्र मालेगांव,कळवण, सटाणा,देवळा,नांदगाव, चांदवड तालुका असून गेल्या महिन्यात पार पडलेल्या निवडणुकीनंतर आज रोजी चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक सुद्धा बिनविरोध पार पडली. त्यात चेअरमन म्हणून किशोर ज्ञानदेव पवार यांची तर व्हाईस चेअरमन म्हणून संदीप दुकळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी चेअरमन पदाला सूचक म्हणून चंद्रभान पवार तर अनुमोदक सुधाकर पवार हे होते व्हाईस चेअरमन पदासाठी सूचक विलास पवार हे असून अनुमोदक निलेश नहिरे हे होते. यावेळी नवनिर्वाचित संचालक विलास पवार,सुधाकर पवार,चंद्रभान पवार,विकास देवरे,दादाजी नेरकर,प्रशांत भामरे,महेश अहिरे, सुमित बच्छाव,उज्ज्वल हिरे, निलेश नहिरे,तिलोत्तमा पवार, प्रतिभा पाटील,अरुण आहिरे तसेच सर्व संघटनांचे राज्य, जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तालुका उपनिबंधक मा.सचिन घोडके साहेब व मोरे साहेब यांनी काम बघितले. निवडीनंतर नवनियुक्त चेअरमन किशोर पवार व व्हा. चेअरमन संदीप दुकळे यांचा सत्कार सर्व सभागृह यांनी केला. नवनिर्वाचीत चेअरमन किशोर पवार व व्हा.चेअरमन यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी हेमंत पाटील,विजय अहिरे, विनायक ठोंबरे,भास्कर पवार, जिभाऊ बच्छाव,सुकदेव पवार, संजय शेवाळे,मिलिंद भामरे, संजय पगार,भाऊसाहेब पवार, संदिप सूर्यवंशी,योगेश शेवाळे,संदिप पाटील,विजय सू्र्यवंशी,वैभव आहेर,दिलीप वाघ,मधु पाटील,भाऊसाहेब कापडणीस,विलास बोरसे,शरद पवार,बाळा आहेर,भीमराव मगर, राजेंद्र खैरनार,मनोज पवार, बाजीराव अहिरे,सचिन शिंदे, हेमंत पवार,अशोक पवार,दिपक मांडवडे,विजय पिंगळे,प्रमोद बच्छाव,रमेश सोनवणे,लालसिंग पवार,आदि सर्व संघटनाचे जेष्ठ पदाधिकारी व सभासद संस्था कर्मचारी भीमराव ठाकरे,शरद पवार हे यावेळी उपस्थित होते.
सूत्रसंचालन संस्थेचे माजी चेअरमन विनायक ठोंबरे यांनी केले तर भाऊसाहेब पवार व निलेश नहिरे यांनी आभार मानले.

——————-

सन १९९९ ला संस्था स्थापन करताना उपनिबंधक कार्यालयाकडून आंब्याचे नव्हे तर चंदनाचे रोप घेतले, त्याचा सुगंध आजीवन सर्वदूर पसरावा यासाठी वचनबद्धतेची शपथ घेतली होती.ती पूर्णत्वास गेली.आज या रोपाचे वटवृक्षात रूपांतर झालेले आहे.
संस्थेचे सभासद हेच आमचे दैवत व सभासद हाच केंद्रबिंदू मानून सेवा धर्म निभवत आहे.सर्वांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने संस्थेच्या कार्याचा नावलौकिक सर्वदूर पोहचला आहे.यापुढेही सर्वांच्या सहकार्याने आदर्श व पारदर्शी कारभार सुरळित ठेवत सभासद व संस्थेच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. येत्या काळात संस्थेला नवीन उंचीवर पोहोचवण्याचा मानस आहे.
किशोर पवार :- नवनिर्वाचित चेअरमन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here