राजेंद्र पाटील राऊत
नगांव प्रकरणात भागाबाई मृत्यू प्रकरणात खोटी माहिती देणाऱ्या विरुध्द कारवाई करण्यास टाळाटाळ..! खोटी मृत्यूची नोंद कुणाच्या आशिर्वादाने? संतप्त सवाल! मालेगांव,(राजेंद्र पाटील राऊत)- युवा मराठा आँनलाईन वेब पोर्टलवर काल दिनांक ७ व युवा मराठा वृतपत्राच्या आँनलाईन अंकात आज दिनांक ८ जुन रोजी सविस्तर बातमी प्रकाशित होताच, नगांव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रल्हाद खैरनार,उपसरपंच व शिपाई यांनी “युवा मराठा”शी तातडीने संपर्क साधत लेखी खुलासा सादर केला असला,तरी अनेक गंभीर प्रश्न यानिमिताने चव्हाटयावर येत आहेत.प्रशासनाचा अर्थातच ग्रामपंचायतीचा कारभार कसा ढिसाळपणाचा व मनमानीप्रमाणे चालतो हे या नगाव प्रकरणावरुन समोर आले आहे.नगाव शिवारात राहणारी भागाबाई चिंतामण बागुल या वयोवृध्द महिलेला दोन मुले व एक मुलगी असून,तिघेही विवाहित आहेत.तथापी भागाबाईचा मुलगा नामदेव याने गेल्या काही काळापूर्वी भागाबाईचे दिशाभूल करुन व खोटे मृत्यूपत्र मालेगांवच्या दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवून घेतले होते.व सदरच्या मृत्यूपत्रात संपूर्ण शेतीसंपतीचे अधिकार नामदेव या मुलास राहतील असे भागाबाईने मुलगा अशोक यास डावलून मृत्यूपत्र लिहून दिले खरे.मात्र ते खरे किंवा खोटे याचा उलगडा येणाऱ्या काळात लवकरच होईल.मात्र त्यानंतरच्या काळात नामदेव बागुल याने एक वेगळीच चालाखी केली.दिनांक २३ फेब्रुवारी २०२३ रोजी नगाव ग्रामपंचायतीकडे रितसर लेखी अर्ज देऊन आपली आई भागाबाई दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी मृत्यू पावलेली असल्याने मृत्यू नोंद करण्याची विनंती केली.मात्र नगाव हे गाव अगदी बोटावर मोजण्या इतक्या लोकवस्तीचे गाव असून,या गावात व शेतशिवारात कुणाचेही निधन झाले तरी त्याचा बोभाटा होतो.मात्र भागाबाई हि खरोखरच मृत्यू पावली किंवा नाही याची साधी शहनिशा करुन खात्री करण्याची नैतिक जबाबदारी ग्रामसेवक प्रल्हाद खैरनार व शिपायाने न घेता.दिनांक २३ फेब्रुवारी २०२३ रोजी भागाबाई मयत असल्याची नोंद ग्रामपंचायत रेकाँर्डला घेतली.प्रत्यक्षात भागाबाई बागुल २१ फेब्रुवारी २०२३ पर्यत जीवंत असताना एका साध्या अर्जावर भागाबाई मृत्यूनोंद लावण्याची घाईगडबड नगाव ग्रामपंचायत प्रशासनाने कुणाच्या दडपणाखाली केली.यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.नामदेव बागुल हा मालेगाव महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत असून,यापूर्वी तो नोकरीतून निलंबित झाल्याची माहिती मिळत आहे.तर स्वार्थासाठी कलियुगातील नामदेव हा कोणत्या स्थराला गेला व ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्वतःच्या जीवंत आईला मयत दाखविण्याचे धाडस केले. नगाव ग्रामपंचायतीला उशिरा सुचलेले शहाणपण भागाबाई मृत्यू प्रकरण आपल्या अंगाशी येण्याची चिन्हे दिसून लागताच ग्रामसेवक प्रल्हाद खैरनार व ग्रामपंचायत प्रशासनाने नामदेव चिंतामण बागुल याचे दिनांक १२ एप्रिल २०२३ रोजी एक शंभर रुपयाच्या स्ट्ँम्पपेपवर प्रतिज्ञापत्र घेऊन भागाबाई मृत्यूची खोटी माहिती दिल्याचे लिहून घेतले खरे…पण फेब्रुवारी मध्ये मृत्यूची नोंद करणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाला तब्बल दिड महिना उशिराने कशी उपरती सुचली की,ग्रामपंचायतीत मृत्यूची खोटी नोंद करण्यात आलेली आहे.म्हणूनच मग आपली “कातडी बचाव” भुमिका घेत ग्रामपंचायतीने नामदेव चिंतामण बागुल याचेकडून प्रतिज्ञापत्र लिहुन घेतले.मात्र खोटी माहिती लेखी स्वरुपात देऊन जीवंत व्यक्ती मृत्यू पावल्याचे दाखविणा-या नामदेववर व त्याच्या खोट्या व लबाडीच्या प्रकरणाची कुठलीही शहनिशा न करता मृत्यू दाखला बनविणा-यां विरुध्द अद्याप गुन्हा का दाखल झाला नाही? याप्रकरणाची खातेनिहाय चौकशी करुन दोषीवर कारवाई होणे गरजेचे असताना,हे प्रकरण दडपण्याचेच जास्त प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे.बाँक्स दरम्यान युवा मराठा न्युजकडे दिनांक ८ जुन रोजी नगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.गायकवाड,उपसरपंच जमनालाल अहिरे,ग्रामसेवक प्रल्हाद खैरनार यांनी दिलेल्या लेखी खुलासापत्रात म्हटले आहे की,वरिष्ठांच्या परवानगी नुसार सदरच्या मृत्यू नोंदी मध्ये सुधारणा केली जाईल.असा खुलासा देण्याबरोबरच खोटे व कागदोपत्री लबाडीचे कामे करुन जीवंत भागाबाईला मयत दाखविणा-या विरुध्द मात्र ठोस कार्यवाहीचा काहीच खुलासा या पत्रातून करण्यात आलेला नाही.