Home नाशिक बुंधाटे ग्रामपंचायतीच्या विविध समित्यांची स्थापना ग्रामसभेत संपन्न

बुंधाटे ग्रामपंचायतीच्या विविध समित्यांची स्थापना ग्रामसभेत संपन्न

334

आशाताई बच्छाव

IMG-20230602-WA0022.jpg

डांगसौंदाणे,(विजय बागुल प्रतिनिधी)-                  ग्रामपंचायत कार्यालय बुंधाटे १/६/२०२३ वार गुरुवार रोजी आयोजित केलेल्या ग्रामसभेत ग्राम स्तरावरील विविध समित्यांची नूतन स्थापना करण्यात आली यामध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समिती , ग्राम दक्षता समिती , महिला बचत गट नियोजन समिती अश्या विविध समित्या घटीत झाल्या यांमध्ये तरूण पिढीला पुढे येण्याचे एक व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य ग्रामपंचायत मार्फत मिळाले.. त्याचप्रमाणे गावात लवकरच पूर्णतहा दारूबंदी व्हावी यासाठी सरपंच व उपसरपंच स्वतःजातीने लक्ष घालून दारू विक्री करताना आढलून आल्यास त्याची तक्रार उत्पादन शुल्क व पोलिस प्रशासनाकडे देणार आहेत. पावसाळा सुरू होणार असून गावातील सांडपाण्याच्या गटारींचे स्वछता त्याचप्रमाणे आरोग्याविषीयी रोगराई पसरू नये जंतुनाशक औषधांची फवारणी करणे अश्या विविध कामांचे नियोजन करण्यात झाले. ग्रामसेवक सरपंच उपसपंच व आजी माजी सदस्य सर्वांनी उपस्थित राहून ग्रामस्थांना गावाच्या विकासाला अजुन कश्याप्रकारे चालना देता येईल याचे मार्गदर्शन केले व ग्रामस्थांच्या अडचणी सोडवून त्याचे निरासरण करण्यात आले. योग्य पद्धतीने ग्रामसभेची समाप्ती झाली.

Previous articleपद्मश्री तसंच महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित मराठी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं निधन
Next articleयुवा मराठा नावाची जादू…!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.