Home उतर महाराष्ट्र राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या २९८व्या जयंती निमित्त वासखेडी येथे ग्रामपंचायत स्तरीय पुरस्काराचे...

राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या २९८व्या जयंती निमित्त वासखेडी येथे ग्रामपंचायत स्तरीय पुरस्काराचे व विविध साहित्याचे वितरण…..

52
0

आशाताई बच्छाव

IMG-20230601-WA0005.jpg

राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या २९८व्या जयंती निमित्त वासखेडी येथे ग्रामपंचायत स्तरीय पुरस्काराचे व विविध साहित्याचे वितरण…..

वासखेडी/धुळे,(दिपक जाधव ब्युरो चीफ)- – येथील ग्रामपंचायतीला पुण्यश्लोक, राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या २९८व्या जयंती निमित्त प्रतिमेचे पुजन सरपंच स्वाती सोनवणे,उपसरपंच सिंधुबाई हांडु कुवर ,सदस्या कविता कुवर,रयत कामगार संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार दिपकभाऊ जाधव व ग्रामसेविका सौ गिता बैरागी,जि.प.शिक्षक केवबा बच्छाव व अ़ंगणावाडी सेविका,मदतणीस यांच्या हस्ते पुजन करून पुष्पवृष्टी व पुष्पहाराने वंदन करण्यांत आले.राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र शासनाने प्रत्येक ग्रांमपंचायतीला समाजातील सामाजिक कार्यातील कर्तृत्व असणाऱ्या महिलांचा सन्मान करुन समाजातील महीला अधिकाधिक सक्षम व्हाव्यात यासाठी या वर्षापासुन दर वर्षी हा पुरस्कार दिला जाईल,या पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ,प्रमाणपञ, स्मृतीचिन्ह, रोख रक्कम पाचशे,असा असुन,या सन्मानाचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,व महिला व बालविकास मंत्री लोढा साहेब यांच्या स्वाक्षरीने प्रमाणपञ व स्मृतिचिन्ह देण्यात आले, समाजातील पाच महिलांचा यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात सन्मान करण्यांत आला समाजसेवी आवड असणाऱ्या, स्वाध्यायी पंथातील,भुकेल्याची भुक जाणणारे, ज्यांचा आदर्श घ्यावा ,असे थोर व्यक्तीमत्व असलेल्या , श्रीमती मंगलबाई बापुराव जाधव यांना ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करून एक आदर्श स्री म्हणुन यावेळी त्यांचा सन्मान करण्यांत आला, यावेळी सौ,कविता कुवर,सौ,कुमुदिनी कुवर,सौ राजबाई भवरे,सौ,कुवर यांचा देखील यावेळी राजमाता अहिल्याबाई होळकर पुरस्काराने गाैरवण्यात आले, जयंतीला संबोधीत करतांना जि.प.शिक्षक बच्छाव म्हणाले की,धर्मनिष्ठ न्याय राज्य कारभाराचा ज्यांनी इतिहास रचला त्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्मदिवस अखंड भारतात साजरा होतांना दिसत आहे,पुण्यश्लोक म्हणजे ज्याने पुण्य कमावले आहे असे पुण्यश्लोक विरांगणा अहिल्याबाई होळकर होय,आज अहिल्यादेवी म्हणुन त्यांची ओळख,कर्तुत्ववान, धर्मपरायण, राजकारणी,सुधारणावादी,अशी होय,त्यांनी न डगमगता मराठा साम्राज्य सांभाळले,एक दोन नाहीतर तब्बल अठ्ठावीस वर्ष जनहिताचा राज्यकारभार आदर्श ठरलाय,त्यांनी तिर्थक्षेत्री नदीवर घाट बांधले,मंदीरे,धर्मशाळा बांधल्या,लोकांच्या मनात स्वराज्याचा विश्वास निर्माण केला त्यांनी कधीही हाती शिवलिंग घेऊनच न्यायनिवाडा केला, त्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांना त्रिवार वंदन करतो आणि थांबतो,
यावेळी दिव्यांगांना देखील धनादेशाचे रयत कामगार संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार दिपकभाऊ जाधव यांच्या हस्ते वाटप करण्यांत आले, व अंगणवाडीतील पोषण आहारासाठी ग्रास व भांडी वाटप ,तसेच स्तनधा माता यांच्यासाठी देखील दुधातील पोषक पावडर चे देखील यावेळी झाले ,कुठेही आग लागु नये व तात्काळ आग विजावी यासाठी अग्नि बंब चे अंगणवाडी व ग्रामपंचायतीस वितरण करण्यांत आले यावेळी,सरपंच स्वाती सोनवणे,उपसरपंच सिंधुबाई कुवर,सदस्या कविता कुवर,रयत कामगार संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार,ग्रामपंचायत सदस्य दिपकभाऊ जाधव, ग्रामसेविका सौ गिता बैरागी, जि.प.शिक्षक केवबा बच्छाव,अंगणवाडी सेविका,मनिषामाई बच्छाव, पल्लवी वाघ,सौ,ठाकरे,जामकी अंगणवाडी सेविका कोकणी,मदतणीस दहीते,नेरकर,माळचे ग्रामपंचायत कर्मचारी शशीकांत वाघ,धनराज सुर्यवंशी, महेंद्र कुवर,आपरेटर जगदीश कुवर,विजय भिल,आशासेविका व महीला मंडळ अपंग बांधव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…

Previous articleतहसीलदारांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे
Next articleमोठी बातमी! मुलांच्या तस्करीचे सर्वात मोठे रॅकेट उघड; भुसावळ येथून २९ तर मनमाड येथे ३० मुलांची सुटका
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here