Home मुंबई मिस् कॉल वर मिळणार मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता निधीचा अर्ज

मिस् कॉल वर मिळणार मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता निधीचा अर्ज

104
0

आशाताई बच्छाव

IMG-20230526-WA0013.jpg

मिस् कॉल वर मिळणार मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता निधीचा अर्ज
भास्कर देवरे
युवा मराठा न्युज

मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळविण्यासाठी राज्य सरकारकडून आता नवी सुविधा योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार संपर्कासाठी ८६५०५६७५६७ हा नवा मोबाइल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर मिस्ड कॉल देताच मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज मोबाइलवर उपब्लध करून दिला जाणार आहे. ग्रामीण भागांसह राज्यातील इतर कानाकोपऱ्यांतून या सहायता निधीतून मदतीसाठी इच्छुक असणाऱ्या नागरिकांना या सुविधेमुळे दिलासा मिळणार आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत जाहीर केली जाते. विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जाते. यासाठीचा अर्ज कुठे मिळतो, तो कसा भरायचा किंवा तो मुख्यमंत्री कार्यालयातूनच घ्यावा का, अशा विविध शंका सर्वसामान्यांच्या मनात असतात. सर्वसामान्य नागरिकांची ही शंका दूर करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने आता नवा उपक्रम जाहीर केला आहे. नव्या उपक्रमानुसार नागरिकांसाठी ही मिस्डकॉलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
इच्छुकांनी या क्रमांकावर मिस्डकॉल दिल्यानंतर अर्जाची लिंक एसएमएसद्वारे मोबाइलवर येईल. त्या लिंकवर क्लिक करताच अर्ज डाउनलोड होईल. या अर्जाची प्रिंट काढून तो भरून त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह सर्व पोस्टाद्वारे किंवा स्कॅन करून पीडीएफ स्वरूपात cmrf.maharashtra.gov.in या ईमेल आयडीवर पाठवता येईल, अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली. मुख्यमंत्री सहायता निधीचे सर्वाधिक येणारे अर्ज हे कर्करोगासाठी आहेत. त्यापाठोपाठ हृदयविकार, अपघात, गुडघा प्रत्यारोपण, खुबा प्रत्यारोपण, डायलिसिस, किडनी विकार या आजारांसाठी अर्ज येतात.
अन्य रुग्णांनादेखील प्रथमच भाजलेल्या तसेच शॉक लागलेल्या रुग्णांचाही या निधीतील आजारांच्या यादीत समावेश केला आहे. अशा रुग्णांना या निधीतून ५० हजार रुपयांची मदत मिळनार आहे यामुळे गरजू लोकांना खूप मोठा फायदा होणार आहे.

Previous articleसटाणा व्ही.पी.एन उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल ७९.४८ % ; हर्षाली संजय दळवी विद्यालयात प्रथम
Next articleयेवते पाटील विवाह सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here