
आशाताई बच्छाव
डॉ मणिभाई प्रतिष्ठानाकडून पुण्यात पद्मश्री मणिभाई देसाई राष्ट्रसेवा अवॉर्ड वितरण. युवा मराठाचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांचेसह इतर पुरस्कारार्थींसोबत लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या १३ जणांचा होणार गौरव!
अकोला,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रातील अग्रेसर व निती आयोग संलग्नित पुण्याच्या डॉ.मणिभाई देसाई प्रतिष्ठानाकडून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या नामवंतांना २०२३ च्या पद्मश्री मणिभाई देसाई राष्ट्रसेवा अवार्ड ने सन्मानित करण्यात येणार आहे.३५ वर्षांपासून सामाजिक,शैक्षणिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात आणि विशेषत: निराधार,अपंग आणि वंचितांसाठी अविरत कार्यरत राहणाऱ्या ह.भ.प.प्रवचन- प्रबोधनकार डॉ.रविन्द्र भोळे यांचे हे आयोजन असून ते मनिभाई देसाई प्रतिष्ठानाचे संस्थापक- अध्यक्ष आहेत.
यामध्ये युवा मराठाचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांना हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे.
येत्या २७ एप्रिल २०२३ रोजी पुणे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला मंदिर,गुंजन टॉकीजजवळ,पुणे – नगर हायवे टच, येरवडा,पुणे येथे सायंकाळी ५.०० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन केले असून.याप्रसंगी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील ,अकोला येथून लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख( निंबेकर)आणि ईतर नामांकीत मान्यवर या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी महाराष्ट्रातील विविध दिग्गज पुरस्कारार्थींसह अकोला येथून दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या राज्य आणि जिल्हा पातळीवरील १३ पदाधिकाऱ्यांना सन्मानित केले जाणार आहे.यामध्ये प्रदिप जी खाडे,राजेन्द्रजी देशमुख,अॕड.राजेश जाधव,अंबादास तल्हार मोहन शेळके( अकोला) रामराव देशमुख,पंजाबराव देशमुख( खामगांव,जि.बुलढाणा) युवा मराठा न्युजचे बुलढाणा ब्युरो चीफ स्वप्निल देशमुख,संग्रामपूर,जि- बुलढाणा) अॕड.स्मिता चिपळूणकर ( कुर्ला, मुंबई) अॕड.पियाली घोष( पूणे),अमिता कदम ( ठाणे, मुंबई)पंकज राऊत,जगदिशप्रसाद करोतिया,( बोईसर,कोकण) सौ.कल्याणी किशोर मुटे(हिंगणघाट,वर्धा) यांना पद्मश्री मणिभाई देसाई राष्ट्रसेवा अवॉर्ड प्रदान
करून या कार्यक्रमात सन्मानित केले जाणार आहे.