Home Breaking News मध्यप्रदेशातील सिहोरमध्ये रुद्राक्ष महोत्सवात चेंगराचेंगरी एक महिला ठार चार बेपता…

मध्यप्रदेशातील सिहोरमध्ये रुद्राक्ष महोत्सवात चेंगराचेंगरी एक महिला ठार चार बेपता…

181

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

Screenshot_20230216-230646_Facebook.jpg

मध्यप्रदेशातील सिहोरमध्ये रुद्राक्ष महोत्सवात चेंगराचेंगरी एक महिला ठार चार बेपता… सिहोरहून,  प्रतिनिधी (राकेश पाटिल / दिपक भावसार/ प्रशांत बच्छाव प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- मध्यप्रदेशातील सिहोर येथील कुबेरश्वर धाम नावाने परिचीत असलेल्या ठिकाणी महाशिवरात्रीच्या मुहुर्तावर श्री.विठ्ठलेश सेवा समितीने आयोजीत केलेल्या रुद्राक्ष महोत्सव व शिवपुराण कथा वाचन कार्यक्रमात रुद्राक्ष मिळविण्यासाठी झालेल्या चेंगराचेंगरीत महाराष्ट्रातील एक महिला जागीच ठार झाली,तर चार महिला अजून बेपता आहेत.युवा मराठा न्युजच्या प्रतिनिधीनी थेट घटनास्थळावरुन दुरध्वनीव्दारे दिलेली माहिती अशी की,सिहोर मधील रुद्राक्ष महोत्सव कार्यक्रमासाठी देशभरातून मोठया संख्येने भाविक रात्रीपासूनच सिहोर मध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली होती,तर येथे कुठल्याही प्रकारचे नियोजन नव्हते साधे पिण्यासाठी पाणी देखील उपलब्ध नव्हते त्यामुळे असंख्य भाविक हे रात्रीपासून अन्न पाण्यावाचून उपवासी होते.आज रुद्राक्ष वाटप कार्यक्रम सुरु होताच भाविकांची झुंबड उडाली व त्यात हि दुर्घटना घडली.मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान सिहोरचा दौरा करणार असल्याचे जाहिर करण्यात आले आहे. *हा तर श्रध्देचा बाजार व पाखंड असल्याचे परखड मत मध्यप्रदेश मधील एका न्युज चँनलचे सिनीयर पत्रकार रमेश शर्मा यांनी व्यक्त केले आहे.*

Previous articleलासलगाव रेल्वे अपघात प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
Next articleमालेगांवी युवा मराठा महासंघाचा आगळा वेगळा उपक्रम श्री शिवजन्मोत्सव नाचून नाहीतर वाचुन साजरी करण्याचा निर्धार – गाडेकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.