Home सामाजिक मालेगांवी युवा मराठा महासंघाचा आगळा वेगळा उपक्रम श्री शिवजन्मोत्सव नाचून नाहीतर वाचुन...

मालेगांवी युवा मराठा महासंघाचा आगळा वेगळा उपक्रम श्री शिवजन्मोत्सव नाचून नाहीतर वाचुन साजरी करण्याचा निर्धार – गाडेकर

68
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

Screenshot_20230218-081219_Facebook.jpg

मालेगांवी युवा मराठा महासंघाचा आगळा वेगळा उपक्रम श्री शिवजन्मोत्सव नाचून नाहीतर वाचुन साजरी करण्याचा निर्धार – गाडेकर मालेगाव (प्रतिनिधी शुभम ओढेकर युवा मराठा न्युज ) – आज संपूर्ण देशभरात साज-या होत असलेल्या शिवजयंती महोत्सवात युवा मराठा महासंघाच्या वतीने आगळा वेगळा उपक्रम राबविला जात असल्याची माहिती युवा मराठा महासंघाचे मालेगाव युवा शहराध्यक्ष आंशुराज पाटिल,कँम्प विभाग युवा अध्यक्ष ओम गाडेकर व कँम्प युवा उपअध्यक्ष गौतम कावळे यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी “नाचून नव्हे तर वाचून” जयंती उत्सव साजरा करण्याची संकल्पना महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटिल – राऊत यांच्या प्रेरणेतून घेऊन आजचा जयंती सोहळा छत्रपती शिवाजी महाराज वाडीतील विद्यार्थीयांना शिव चरित्रांची पुस्तके भेट देऊन आणि निराधार व गरीब नागरिकांना ब्लँकेट वाटप करण्यात येऊन साजरा केला जाणार आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गौतम कावळे आंशुराज पाटिल आणि महासंघाचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत तर हे आयोजन युवा मराठा महासंघ व जय शिवराय ग्रुप मालेगाव शहरच्या वतीने करण्यात आला आहे

Previous articleमध्यप्रदेशातील सिहोरमध्ये रुद्राक्ष महोत्सवात चेंगराचेंगरी एक महिला ठार चार बेपता…
Next articleनिलेश सातपुते यांना उत्कृष्ट डिजिटल मीडिया पत्रकार पुरस्कार जाहीर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here