Home बुलढाणा ग्रामपंचायत कोद्री येथील बनावट दस्ताऐवज बंद करणे व नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविणे...

ग्रामपंचायत कोद्री येथील बनावट दस्ताऐवज बंद करणे व नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविणे च्या मागणी साठी आमरण उपोषणाला सुरुवात!

37
0

आशाताई बच्छाव

IMG-20230124-WA0039.jpg

ग्रामपंचायत कोद्री येथील बनावट दस्ताऐवज बंद करणे व नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविणे च्या मागणी साठी आमरण उपोषणाला सुरुवात!

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क संग्रामपूर)

संग्रामपूर तालुक्यातील ग्राम कोद्री येथे आज दिनांक 24 फेब्रुवारी 2023 पासून श्रीराम पाटील खोंड यांनी ग्रामपंचायतच्या मनमानी कारभारामुळे व वरिष्ठांकडून संबंधित दोशींवर कार्यवाही होत नसल्यामुळे अखेर ग्रामपंचायत कार्यालयापुढेच आमरण उपोषणास सुरुवात केली आहे सविस्तर माहिती अशी आहे की ग्रामपंचायत कोद्री व पंचायत समिती संग्रामपूर यांच्याकडून नियम धाब्यावर ठेवून खरोखरच गरजू लाभार्थ्यांना घरकुल प्रपत्र (ड) यादीतून वगळून बनावट व चुकीचे कागदपत्र तयार करून गोरगरीब गरजू लाभार्थ्यांना वगळले व सत्यता लपवून अनियमितपणे काही पैशाची देवाणघेवाण करून वरिष्ठ पातळीवर शासनाची दिशाभूल करून लाभार्थी निवडले व गावातील मूलभूत सुविधे पासून नागरिकांना वंचित ठेवणाऱ्या ग्रामपंचायत विरुद्ध स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट 2022 रोजी श्रीराम पाटील व कोद्री येथील नागरिक जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे आमरण उपोषणाला बसले होते व त्यांना त्यावेळेस कार्यवाही करण्याचे लेखी पत्र सुद्धा जिल्हा परिषद कडून देण्यात आले होते. परंतु आज पर्यंत कुठलीही तक्रारीची दखल घेण्यात आली नसल्यामुळे श्रीराम पाटील खोंड यांनी 17 जानेवारी23 रोजी पंचायत समिती व तहसील कार्यालय संग्रामपूर व 19 जानेवारी रोजी जिल्हा परिषद बुलढाणा व 23 जानेवारी 2023 रोजी पोलीस स्टेशन तामगाव यांना अमरण उपोषणाबाबत निवेदन दिले त्या अनुषंगाने आज रोजी आमरण उपोषणास सकाळी दहा वाजता त्यांनी ग्रामपंचायत कार्याल कोद्री समोर सुरुवात केली त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भ्रष्टाचार उघड होऊनही आपल्या कार्यालयाने काहीच कारवाई केली नाही तरी ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन परिपत्रक दिनांक 4 जानेवारी 2017 नुसार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपणास वर्ग तीन च्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे अधिकार प्रदान केलेल्या अधिकारानुसार आपण नियमानुसार संबंधित दोषीवर त्वरित कार्यवाही करावी असे आपल्याला प्रकल्प संचालक यांचा आदेश आलेला आहे तो सोबत जोडलेला आहे. तसेच उपमुख्य कार्यपालन अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद यांचाही आदेश आहे तरी 23 जानेवारी 2023 पर्यंत सर्व दोशी वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून अहवाल देण्यात यावा अन्यथा आम्ही सर्व वंचित नागरिक 24 फेब्रुवारी 2023 पासून ग्रामपंचायत कोद्री कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसणार आहे आणि त्यामुळे अनुचित प्रकार घडल्यास आपल्या कार्यालयाची जबाबदारी राहील आम्ही त्रस्त नागरिक मूलभूत सुविधांसाठी अर्ज केलेला आहे पाणी रस्ता घरकुल आरोग्य शिक्षण या सर्व सुविधा पुरवणे आपली जबाबदारी आहे अशा आशयाचे निवेदन त्यांनी दिले होते. परंतु वरिष्ठ पातळीवर आमरण उपोषणाच्या निवेदनाची दखल घेण्यात आलेली नसल्यामुळे अखेर श्रीराम पाटील खोंड यांनी कोद्री ग्रामपंचायत समोर आज पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here