Home बुलढाणा श्री शिवशंकर विद्यालयात आनंद मेळावा उत्साहात,. वानखेड…

श्री शिवशंकर विद्यालयात आनंद मेळावा उत्साहात,. वानखेड…

70
0

आशाताई बच्छाव

IMG-20230121-WA0033.jpg

श्री शिवशंकर विद्यालयात आनंद मेळावा उत्साहात,. वानखेड…
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज बुलढाणा

श्री शिवशंकर विद्यालयात मंगळवारी दि.17-01-2023 स्काऊट गाईड पथकाच्यावतीने आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी विद्यालयलयाचे उपाध्यक्ष श्री राजकुमारजी गांधी होते.तर प्रमुख अतिथी म्हणून कोषाध्यक्ष श्री मनोजभाऊ पालीवाल, सदस्य श्री संतोषभाऊ येनकर,माजी शिक्षक पालीवाल सर, पवनभाऊ पालीवाल,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर ओ राठी सर होते.
विद्यार्थ्यांनी आनंद मेळाव्या मध्ये छान खाऊची दुकाने लावली होती. यामध्ये भेळ, इडली, पाणीपुरी, मसाला दुध, पोहे….. इत्यादी पदार्थांचे स्टॅाल्स लावण्यात आले होते. प्रत्येकाने आपली दुकानं छान सजवली होती. सुंदर दुकानाच्या नावाची पाटी तयार करून लावली होती. विद्यार्थ्यांची तयारी व उत्साह पाहता आनंद मेळावा आयोजित करण्या मागील उद्देश विद्यार्थ्यांन मध्ये व्यवस्थापन कौशल्य व व्यवहार ज्ञान विकसित करणे हे सार्थक झाल्या सारखे वाटले.
स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी खरी कमाई करण्याच्या दृष्टीने विविध खाद्यपदार्थ घरुन तयार करून आणले व 45 स्टॉल लावण्यात आले.विद्यार्थांनी 4900 रुपयांची विक्री करून 4% खरी कमाई मधुन गाईड शिक्षिका सरदार मॅडम यांच्याकडे सुपूर्द केली, कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्काऊट शिक्षक जोशी सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Previous articleनवनियुक्त न्यायधीश उमाकांत शिंदे यांचे महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाकडुन सत्कार
Next articleमोहनलाल माळी यांचा वडगाव साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेमार्फत सत्कार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here