Home नांदेड श्री हनुमान मुर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्य अंखड हरिनाम सप्ताह कुंचेलि ता. नायगाव...

श्री हनुमान मुर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्य अंखड हरिनाम सप्ताह कुंचेलि ता. नायगाव येथे दि.२० जाने.ते २७ जाने.२०२३ नविन वर्षात धार्मिक कार्यक्रमाचेआयोजन.

124
0

आशाताई बच्छाव

IMG-20230120-WA0035.jpg

श्री हनुमान मुर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्य अंखड हरिनाम सप्ताह कुंचेलि ता. नायगाव येथे दि.२० जाने.ते २७ जाने.२०२३ नविन वर्षात धार्मिक कार्यक्रमाचेआयोजन.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार
कुंचेली ता. नायगाव येथे नविन वर्षाच्या सुरूवातीला हरिनाम सप्ताह अनेक धार्मिक कार्यक्रम ह.भ.प. सदगुरू चंद्रशेखर महाराज देगलुरकर, ह. भ. प. सदगुरूनराशाम महाराज यांच्या कृपा आर्शिवादाने आयोजित केले आहे.
दररोज पहाटे काकडा आरती, सकाळी ग्रथ ज्ञानेश्वरी पारायण, गाथाभजन,हरिपाठ, रात्री ८ ते १० हरिकिर्तन, दि.२० जाने.२३ हभप विष्णु महाराज तांंदळीकर
२१ जाने.२३ह.भ.प. भागवताचार्य तुकाराम महाराज साखरे,२२जाने.२३,ह.भ.प. वासुदेव महाराज कोंलबीकर,२३ जाने.२३ ह.भ.प. मारोती महाराज सातारा २४ जाने.२३ ह.भ.प. योगेश अग्रवाल वसमत २५ जाने २३ ह.भ.प. कु.वेदिकाबाई महाराज बरबडा,दि.२६ जाने.ह.भ.प. किसन महाराज बरबडेकर दि.२७ जाने.२३ काल्याचे किर्तन ह.भ.प. किसन महाराज बरबडेकर नंतर महाप्रसाद रात्री,जागरण असे चोविस तास नामस्मण करून नविन वर्ष सुखसमृध्दीने सर्वाना आरोग्य, सदगुण प्राप्त व्हावे ,सर्व जनता एकोप्याने राहावे,दुर्गुन प्रवृती नष्ठ होऊन सदगुन प्रवृती निर्माण व्हावी,व्यसनापासुन दुर व्हावे,सदगुणी पिढी निर्माण व्हावी, आई,वडील गुरूची सेवा करण्याची प्रवृती निर्माण व्हावी
दुषित वातावरण अशा धार्मिक कार्याने वातावरनाची शुध्दीकरण व्हावे म्हणुन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
ज्ञानेश्वरी व्यासपिठ ज्ञानेश्वर महाराज बोरगडीकर,चंपतराव डाकोरे पाटिल ,गाथा व्यासपिठ बापुराव पाटिल टाकळिकर, गायनाचार्य हरिपाठ आकाश पाटिल तांदळिकर,गंगाजी महाराज,रमेश पाटिल साईनाथ पाटिल,मृदंगाचार्य विश्वेश्वर महाराज कोलंबि,तुकाराम महाराज मोकासदरा अशा अनेक संताच्या ऊपदेशाने कुंचेली परिसरातील सदभक्तानी अनेक कार्यक्रमात सहभागी होऊन आंनदोत्सवात सहभागी व्हावे. कार्यक्रम यशस्वी व ऊत्साहात संपन्न करून आपल्या जिवनाचे सार्थक करून घ्यावे. अशी विनंती कुंचेलीच्या ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

Previous articleऔरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रक्रियेत सुक्ष्म निरीक्षकांचे पहिले प्रशिक्षण संपन्न
Next articleनांदेड जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here