Home गडचिरोली खेळाडूंनी जिद्द व चिकाटीने स्पर्धेत यशस्वी व्हावे खासदार अशोक नेते यांचे प्रतिपादन...

खेळाडूंनी जिद्द व चिकाटीने स्पर्धेत यशस्वी व्हावे खासदार अशोक नेते यांचे प्रतिपादन इंदिरानगर येथे रात्रकालीन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

33
0

आशाताई बच्छाव

IMG-20221225-WA0049.jpg

खेळाडूंनी जिद्द व चिकाटीने स्पर्धेत यशस्वी व्हावे
खासदार अशोक नेते यांचे प्रतिपादन
इंदिरानगर येथे रात्रकालीन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):- 
क्रिकेट हा खेळ सांघिक कामगिरीचा खेळ असून संपूर्ण संघाचे योगदान स्पर्धा जिंकण्यासाठी लागत असते प्रत्येकाला आपापल्या परीने फलंदाजी व गोलंदाजी करून आपल्या संघाला विजयी करण्याचा प्रयत्न करावा लागतो खेळाडूंनी आत्मविश्वासाने तसेच जिद्द व चिकाटीने खेळ करून स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करावा व स्पर्धेत यशस्वी व्हावे प्रत्येक खेळाडूने शांतचित्ताने व खेळाडू वृत्तीने खेळ करून स्पर्धेमध्ये विजयी होण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी केले. काल दिनांक २४ डिसेंबर रोजी गडचिरोली चषक 2022 रात्रकालीन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी खेळाडूंना व नागरिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, भाजपचे शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कविता उरकुडे भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सागर कुमरे, स्पर्धेचे प्रायोजक रवी फोटो स्टुडिओ चे संचालक रविभाऊ मेश्राम, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम , शहर उपाध्यक्ष कोमल बारसागडे क्रिकेट समालोचक सतीश त्रीनगरीवार, पत्रकार रुपराज वाकोडे विलास नैताम स्पर्धेचे आयोजक अनुराग पिपरे तसेच इंदिरानगर वार्डातील ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यावेळी प्रदेश सदस्य रमेश जी भुरसे व प्रमोदजी पिपरे यांनी खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळेस सर्वप्रथम क्रिकेटच्या मैदानावर विधिवत पूजा करून फीत कापून क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यानंतर खासदार अशोक नेते व जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांनी बॅट हातात घेऊन चौफेर फटकेबाजी करीत क्रिकेटचा आस्वाद घेतला तदनंतर दोन संघादरम्यान क्रिकेटचा सामना सुरू करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन रूपराज वाकोडे व सतीश त्रीनगरीवार यांनी केले.

Previous articleदिव्यांग व्यक्तीवरील अत्याचारातील आरोपी तामगाव पोलीस स्टेशनला अटकेत.
Next articleसभोवतालच्या व देशातील सामाजिक, आर्थीक व राजकिय स्थीतीची जाणीव असणे गरजे — डॅा. नामदेव किरसान.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here