Home गडचिरोली !!अखेर चामोर्शी खरेदी विक्री संघाच्या बिनविरोध प्रक्रियेला नगरसेवक आशीष पिपरे यांनी दिले...

!!अखेर चामोर्शी खरेदी विक्री संघाच्या बिनविरोध प्रक्रियेला नगरसेवक आशीष पिपरे यांनी दिले मुंबई उच्च न्यायालयात आव्हान!!

88
0

आशाताई बच्छाव

IMG-20221126-WA0061.jpg

!!अखेर चामोर्शी खरेदी विक्री संघाच्या बिनविरोध प्रक्रियेला नगरसेवक आशीष पिपरे यांनी दिले मुंबई उच्च न्यायालयात आव्हान!!                                  गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
तालुका खरेदी विक्री संघाची गफलतीने झालेला निवडणूक बेकायदेशीर व लोकशाहीस घातक!
तालुका खरेदी विक्री संघासोबत तालुक्यातील सेवा सहकारी संस्था व बाजार समितीची सखोल चौकशी करण्याचे राज्य सरकारचे आदेश!
दिनांक २६/११/२०२२
चामोर्शी येथील खरेदी विक्री संघातील गफलतीने झालेल्या बेकायदेशीर व लोकशाहीस घातक खरेदी विक्री संघाच्या बिनविरोध निवडनुक प्रक्रियेला अखेर मुंबई उच्च न्यायालयात गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक भाऊ नेते यांचे
मार्गदर्शनाखाली चामोर्शी नगरपंचायत येथील नगरसेवक आशीष पिपरे व अशोक धोडरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे व मंत्रालय मुंबई येथे खासदार अशोक भाऊ नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरसेवक आशीष पिपरे व रमेश अधिकारी यांनी भेट घेऊन झालेला संपूर्ण गैरप्रकार कागदोपत्री पुरावानिशी अवगत केला व सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन थेट मंत्रालयातून राज्याचे सहकार मंत्री नामदार अतुलजी सावे व पणन सचिव अनुप कुमार यादव यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले
गेल्या तीन निवडणुकांपासून चामोर्शी तालुका खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक व संचालक मंडळ संस्थेच्या सभासदांना कुठलीही नोटीस
सूचना व माहिती न देता नियमबाह्य पद्धतीने वार्षिक आमसभा घेऊन व त्या आमसभेत मनमानी पद्धतीने ठराव मंजूर करून एकहाती सत्ता स्थापन करून विरोधकांना संपूर्णपणे संस्थेतून बेदखल करून आपल्या मर्जीच्या उमेदवारांना सभासद यांना बिनविरोध निवडून आणून संस्थेत अनेक आर्थिक गैरव्यवहार करणे हुकुमशाही निर्माण करून अनेक घोटाळे करण्याचे कारस्थान काही प्रस्थापितांकडून केले जात आहे व या आधी या विरोधात चामोर्शी वासिय जनतेनी संपूर्ण शहर कडकडीत बंद ठेऊन अन्यायग्रस्त सभासदांनी काढलेल्या जाहीर विराट मोर्चाला भरभरून समर्थन दिले व सदर प्रकार राज्य सरकारला अवगत केले याची गंभीर दखल सहकार मंत्रालयाने घेतलेली असून यामुळे चामोर्शी येथील प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहेत आता मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतिक्षा करून पुढील आंदोलनाची दिशा व रूपरेषा
ठरविणार व तालुक्यातील सर्व शेतकरी शेतमजूर सभासद बांधवांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा अविरत सुरू ठेवणार अशी ग्वाही आज चामोर्शी येथील दिना विश्राम येथे झालेल्या पत्रकार परिषदेतून नगरसेवक आशीष पिपरे ,रमेश अधिकारी ,अशोक धोडरे व ज्येष्ठ नेते मानिकराव तुरे व इतर सहभागी लोकांनी या प्रसिध्दी पत्रकातून केलेली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here