Home नांदेड जनतेला संरक्षण देणाऱ्या पोलीसांचीच घरे असुरक्षित ▪️मुखेड पोलीस जीव मुठीत धरून राहतात...

जनतेला संरक्षण देणाऱ्या पोलीसांचीच घरे असुरक्षित ▪️मुखेड पोलीस जीव मुठीत धरून राहतात पोलीस काॅलनीत !

63
0

आशाताई बच्छाव

IMG-20221125-WA0046.jpg

जनतेला संरक्षण देणाऱ्या पोलीसांचीच घरे असुरक्षित

▪️मुखेड पोलीस जीव मुठीत धरून राहतात पोलीस काॅलनीत !

▪️ त्वरित घरे बांधून देण्याची पोलीस कर्मचाऱ्यांची मागणी. नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड शहरातील पोलिस कर्मचारी निवासस्थानी राहणारे कर्मचारी हे धोकादायक ६० वर्षाच्या जीर्ण इमारतीत राहतात . ३० निवासस्थानांपैकी केवळ ११ निवासस्थानी कर्मचारी हे जीव मुठीत धरून तिथे राहतात . तालुक्यातील जनतेचे संरक्षण करणारे सध्या स्वतःच्याच घरात भीतीने राहतात याकडे जाणीवपूर्वक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असुन जनतेचे संरक्षण करणारे पोलिसच असुरक्षित

. तालुक्याचे आमदार डॉ . तुषार राठोड हे तीन वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत आणि १५ करोड रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे , असे आम्हाला पोलिस स्टेशनकडून माहिती विचारांती कळाले ; परंतु आम्ही जेव्हा बांधकाम विभागातील उपअभियंता • बालाजी शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता तेव्हा त्यांनी आमच्याकडून प्रस्ताव पाठविण्यात आला व त्याची मंजुरी येणे , स्ट्रक्चर सर्वेक्षण हे सर्व बाबी प्रोसेसमध्ये आहेत , असे दूरध्वनीवरून सांगितले . तसेच या निवासस्थानासाठी उपलब्ध जागा ही १ हे . ६१ आर इतकी आहे आणि मनुष्यबळाइतकेही निवासस्थाने नाहीत . तेथील ६० वर्षांखालील घरांची इतकी दुरवस्था झाली आहे की , तिथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा दाखवता येत नाही आणि बघणाऱ्यांना बघावे वाटत नाही . अशा परिस्थितीत पोलिस स्टेशनकडून निवासस्थानांची दुरुस्ती करावी व नवीन निवासस्थान बांधून देण्यासाठी अनेकदा पत्रव्यवहार करून सुद्धा या डिपार्टमेंटबद्दल बांधकाम विभागाची उदासीनता दिसून आली आहे . पोलिस स्टेशन निवासस्थान प्रांगणात तब्बल एक कोटी खर्च करून इमारत उभी केली ; परंतु इमारतीस विद्युत पुरवठा मीटर नसल्याने ती एक शोभेचीच वस्तू बनली आहे . त्याकडेही कोणाचे लक्ष जात नाही ; परंतु बांधकाम विभाग लक्ष दिले तर त्या ठिकाणी राहण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची योग्य सोय होऊ शकते .

Previous articleसंविधान जनजागृती अभियान चित्ररथाचे जिल्हाधिकारी राऊत याच्या हस्ते उदघाटन
Next articleश्री क्षेत्र जगन्नाथ पुरी येथे भागवत कथा सोहळ्याचे आयोजन  सदगुरु नराशाम महाराज मठ संस्थानचा उपक्रम.  
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here