Home नांदेड संविधान जनजागृती अभियान चित्ररथाचे जिल्हाधिकारी राऊत याच्या हस्ते उदघाटन

संविधान जनजागृती अभियान चित्ररथाचे जिल्हाधिकारी राऊत याच्या हस्ते उदघाटन

121

आशाताई बच्छाव

IMG-20221126-WA0064.jpg

संविधान जनजागृती अभियान चित्ररथाचे जिल्हाधिकारी राऊत याच्या हस्ते उदघाटन
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड (जिमाका) दि. 26 :– भारतीय स्वातंत्र्य व मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नांदेड जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने संविधान जनजागृती अभियान सुरु करण्यात आले, असून या अभियान चित्ररथ वाहनास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी हिरवी झेंडी दाखवून उदघाटन केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे व जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

नांदेड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक सौ.वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून हे अभियान अंमलात आले, असून समाज कल्याण विभागाच्या 20 टक्के उपकर योजनेतून संविधान जनजागृती अभियान राबविले जात आहे. यातून संविधानाचा प्रसार व प्रचार व्हावा या उद्देशाने हे अभियानाची सुरवात जिल्हा परिषदकडून केली आहे.

या अभियानाचे उदघाटन शनिवार दि.26 नोव्हेंबर रोजी अर्थात संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी आयटीआय परीसरातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले येथील पूर्णाकृती पुतळा येऊन चित्रवाहनास हिरवी झेंडी दाखवून संविधान रॅलीस सुरुवात करण्यात आली. या अभियानास अभिजित राऊत व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी शुभेच्छा दिल्या. चित्रवाहनाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील 275 गावांमध्ये जाऊन संविधानाचा प्रचार व प्रसार केला जाणार असल्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी सांगितले.

Previous articleसंविधान दिनानिमित्त आयोजित रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
Next articleजनतेला संरक्षण देणाऱ्या पोलीसांचीच घरे असुरक्षित ▪️मुखेड पोलीस जीव मुठीत धरून राहतात पोलीस काॅलनीत !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.