Home पुणे बेंगलोर हायवे वरती भीषण अपघात:

बेंगलोर हायवे वरती भीषण अपघात:

33
0

आशाताई बच्छाव

IMG-20221121-WA0023.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे; पुणे बेंगलोर हायवे वरती भीषण अपघात: पुणे आणि बेंगलोर हायवे वरती भीषण अपघात घडला. पुणे या ठिकाणी नवले ब्रिज च्या वरती रात्री सुमारे 11 ते 12 च्या दरम्यान एक भीषण अपघात घडला .त्यामध्ये एका टॅंकरचे ब्रेक फेल झाल्यामुळे त्याचा तो टँकर कमीत कमी 48 गाड्यांचा चुराडा करत कमीत कमी पाचशे मीटर पर्यंत ओडत नेले. त्यामध्ये या अपघातात 50 ते 60 प्रवासी जखमी झाले. त्यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला. या मृत्यूमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. एकंदरीतच काय तर हायवे ना वेगाचा फटका बसू लागला आहे .त्यामुळे वाहन नियंत्रणासाठी शासनाने कायदे कठोर करावेत अशी मागणी जनतेकडून होऊ लागली आहे. नवले ब्रिज हा जवळपास अपघाताचा हॉटस्पॉटच ठरत आहे असे दिसते. टँकरचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला असे सूत्रांनी सांगितले आहे. त्यानंतर हा अपघात झाल्यानंतर त्या टँकरचा ड्रायव्हर स्टेरिंग मध्ये अडकलेला दिसून आला. याबाबतची दखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनीही घेतले आहे. पोलीस प्रशासनाला पुढील चौकशीचे आदेशही दिले आहेत .असे अपघात वारंवार होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले.

Previous articleआदिवासी हे वनवासी नाहीत. आदिवासीच देशाचे मूळ मालक – खा. राहुलजी गांधी
Next articleपिंपरी चिंचवड शहर VJNT सेल अध्यक्षपदी राजू लोखंडे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here