Home गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शी ची निवडणूक रद्द करण्यात यावी.

कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शी ची निवडणूक रद्द करण्यात यावी.

125

आशाताई बच्छाव

IMG-20221112-WA0075.jpg

कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शी ची निवडणूक रद्द करण्यात यावी.

  गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

14 जुलै 2022 रोजी भाजप – शिंदे सरकारने घेतलेल्या मंत्रिमंडळ निर्णयानुसार ज्या शेतकऱ्याकडे 10 आर इतकी शेतजमीन असेल अशा 18 वर्षाहुन अधिक वय असलेल्या आणि 5 वर्षा मध्ये किमान तीन वेळा संबंधित बाजार समितीत आपल्या कृषीमालाची विक्री केली असेल , अशा सर्व शेतकऱ्यांना थेट मतदान करता येईल , बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व खातेदार शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला.
परंतु होऊ घातलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका 10 आर. शेतजमीन धारण करणाऱ्या शेतकर्याऐवजी बाजार समिती क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्राथमिक कृषी पतसंस्था / बहूउद्देशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचे अधिकार दिले गेल्यामुळे बाजार समिती क्षेत्रातील शेतकरी मतदानापासून वंचित राहून त्यांचा अधिकार डावळल्या जातो आहे.

तरी कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शी ची निवडणूक रद्द करण्यात यावी . व 14 जुलै 2022 च्या निर्णयानुसार घेण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन मा. उपेन्द्रजी कोठेकर विदर्भ संघटनमंत्री भाजपा यांना देतांना भाजपा तालुकाध्यक्ष श्री. दिलीपजी चलाख , श्री. सुरेशजी शहा जिल्हाध्यक्ष बंगाली आघाडी भाजपा , श्री. साईनाथजी बुरांडे तालुका महामंत्री भाजपा , श्री. सुशांत जी रॉय जिल्हामहामंत्री बंगाली आघाडी , श्री. भोजराज भगत तालुका महामंत्री , श्री. दिपक वासेकर , श्री . संजय चलाख इ.