Home गडचिरोली पारंपरिक दसरा उत्सव निमित्त राम लीला व रावण दहन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन...

पारंपरिक दसरा उत्सव निमित्त राम लीला व रावण दहन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन संपन्न! !चामोर्शी शहरात शंभर वर्षापेक्षा जास्त काळापासून सदर परंपरा अविरत सुरू!

52
0

आशाताई बच्छाव

IMG-20221005-WA0093.jpg

पारंपरिक दसरा उत्सव निमित्त राम लीला व रावण दहन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन संपन्न!

!चामोर्शी शहरात शंभर वर्षापेक्षा जास्त काळापासून सदर परंपरा अविरत सुरू!
!शहरातील शेकडो युवकांचा सहभाग ,युवा नगर सेवक आशिष भाऊ पिपरे यांचा पुढाकार!

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
चामोर्षी येथील संताजी प्रभाग ( गोंड मोहला) येथून शंभर वर्षाहून अधिक वर्षा पासून दरवर्षी दसरा उत्सव निमित्याने रामलीला शोभायात्रा व रावण दहन कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे त्याच परंपरेला अनुसरून दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा जय बजरंग बहुउद्देशीय समाजसेवी संस्था यांच्या वतीने येथील नगर सेवक आशीष भाऊ पिपरे व नगरसेविका सौ सोनाली ताई पिपरे यांच्या पुढाकाराने
या प्रभागात आज पारंपरिक दसरा उत्सव निमित्त रामलीला मिरवणूक व रावण. दहन कार्यक्रम साजरा करण्यात आला,यावेळी संपूर्ण शहरात रामलीला शोभायात्रा काढण्यात आली व सदर रामलीला शोभायात्रा शहरातून फिरल्या नंतर सिमोलंघन करून परत
संताजी क्रीडांगणावर आल्या नंतर पूजनाची परंपरा आटोपल्यावर लगेच मोठ्या उत्साहाने रावण रावण दहन करण्यात आले या रामलीला शोभा यात्रेत शहरातील नागरिक बंधू भगिनी युवक युवती यांनी मोठ्या संख्येने स्वेच्छेने सहभाग घेतला,
या शोभा यात्रेत ” एक ही नाम जय श्रीराम” “जय श्रीराम” च्या डिजे वरील तालावर युवकांनी नृत्य प्रस्तुत केला व नारा दिला या नाऱ्याने आज संपूर्ण शहर दुमदुमले, यावेळी संताजी क्रीडांगण येथे आयोजित रावण दहन कार्यक्रमात चामोर्शी शहरातील शेकडो युवक युवती ,नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन जय बजरंग बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने संताजी नगर प्रभाग वासिय जनता व नगरसेवक आशिष भाऊ पिपरे नगरसेविका सोनाली पिपरे यांनी केले सदर रामलीला शोभायात्रा व रावण दहन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ( गोंड मोहला ) संताजी प्रभाग क्रमांक तीन येथील युवक युवती ,नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here