आशाताई बच्छाव
उदे! गं अंबे उदे! च्या गजरात भाविक भक्त तल्लीन
माहूर ( युवा मराठा न्युज नेटवर्क बस्वराज स्वामी वंटगिरे मुक्रमाबादकर )
आज (26 सप्टेंबर) पासून राज्यासह देशभरात नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. कोरोनामुळे गेले दोन वर्ष उत्सवावर निर्बंध आले होते.मात्र आता शासनाने सवलत दिल्याने यावर्षी भाविकभक्त अतिउत्साही झाले आहे.
नवरात्रीच्या या पहिल्या दिवशी कलश स्थापनेनंतर दुर्गा देवीच्या पहिल्या रूपाचे म्हणजेच देवी शैलपुत्रीचे पूजन केले जाते. शारदीय नवरात्रीत दुर्गा अष्टमी व्रत, अष्टमी तिथीला कन्यापूजन, नवमी तिथीला महानवमी आणि दशमी तिथीला दसरा किंवा विजयादशमी हे सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना किंवा कलश स्थापनेने दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा सुरू होते. 26 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली असून माहूरगड येथे साडेतीन शक्तिपीठा पैकी पूर्ण पिठ प्रसिद्ध असलेले श्री रेणुका मातेचे तीर्थक्षेत्र आहे. आज पहिल्या माळेला दर्शन घेऊन भाविक भक्तासोबत व्ही आय पी नी साकडे घातले. महसूल मंत्री राधाकृष्ण विघे पाटील, नांदेड जिल्हाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, हिंगोली जिल्हाचे खासदार हेमंत पाटील, राजश्री हेमंत पाटील, बाबुराव पाटील कोहळीकर यांच्यासह अनेकांनी माता रेणुकाचे दर्शन घेत साकडे घातले. २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोंबर प्रयेंत शारदीय नवरात्रला सुरुवात होत असल्याने माहूर नगर पंचायतीच्या वतीने शहरात नियंत्रण कक्ष ठेवण्यात आले आहे. भाविकभक्तांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी सी.सी. टीव्ही कॉमेरा लावण्यात आले असून पार्किंग,पिण्याचे पाणी, शौचालय व मुतारिघर, घनकचरासाठी विशेष पथकेची व्यवस्था करण्यात आले आहे अशी माहिती माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी कळविले आहे.
श्री रेणुका मातेचा दर्शनासाठी शहरातून गढावर प्रवास करण्याकरिता खाजगी वाहनावर प्रवेश बंदी आसल्याने बससेवा सुरू असतील.