Home बुलढाणा आजीमच्या खून प्रकरणी आरोपींना सहा दिवसाची पोलिस कोठडी

आजीमच्या खून प्रकरणी आरोपींना सहा दिवसाची पोलिस कोठडी

77
0

आशाताई बच्छाव

IMG-20220905-WA0054.jpg

युवा मराठा न्युज मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर
आजीमच्या खून प्रकरणी आरोपींना सहा दिवसाची पोलिस कोठडी
मोताळा तालुक्यातील राजूर येथील अजीम खान सलाम खान उर्फ ईध्या वय 21 वर्ष याच्या गावातीलच दोन मित्रांनी जुन्या वादातून त्याचा खून केल्याची घटना दिनांक 29 आगस्ट 2022 रोजी रात्री घडली होती . सदर प्रकरणी दोन्ही आरोपींना दिनांक 3 सप्टेंबर 2022 रोजी बोराखेडी पोलिसांनी अटक केली असता त्यांनी सदारच्या घटने बाबतची कबुली दिली आहे या बाबत मृतक आजीम खान सलाम खान यांचा भाऊ बिस्मिल्ला खान यांच्या फिर्यादीवरून राजूर येथील शेख साहिल शेख हमीद वय अंदाजे 20 वर्ष व सैय्यद अजहर सैय्यद हुसैन वय अंदाजे 30 वर्ष या दोघांनी त्यांचा मित्र असलेल्या अजीम खान उर्फ ईध्या याच्या जुन्या वादातून दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी रात्री आजीम चा खून केल्या प्रकरणी दिनांक 2 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा आरोपी शेख साहिल व सैय्यद अजहर विरुद्ध क्रमांक 379/22 च्या कलम 302; 34 ;नुसार गुन्हा दाखल केला होता . दरम्यान आज 3 सप्टेंबर रोजी दोन्ही आरोपींना मोताळा येथे विध्यमान न्यायालयात समोर उभे केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना गुरुवार दिनांक 8 सप्टेंबर 2022 पर्यन्त पोलीस कोठडी सुनावली आहे. कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या आजीमच्या मृत देहाची ओळख पटवून हत्या की आत्महत्या या बाबतच्या तपास करण्याचे मोठे आव्हाहन बोराखेडी पोलिसांसमोर होते . सदर घटनेबाबत पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. अशोक रोकडे व सहकाऱ्यांनी तपासाची चकरे वेगाने फिरवत दोन्ही आरोपींना अटक करून त्यांना गजा आड केली.

Previous articleआरेंदा येथे वैयक्तिक वन हक्क दाव्याचे अर्जांची वाटप माजी जि.प.अध्यक्ष – सौ. भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते..
Next articleसेवानिवृत्त शिक्षकाचे 50 हजार लंपास.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here