Home नाशिक मंगलमय वातावरणात गौराई / महालक्ष्मीचे आगमन

मंगलमय वातावरणात गौराई / महालक्ष्मीचे आगमन

114

आशाताई बच्छाव

IMG-20220904-WA0041.jpg

मंगलमय वातावरणात गौराई / महालक्ष्मीचे आगमन

नांदगाव, प्रतिनिधी अनिल धामणे
दोन वर्षाच्या निर्बधांनतर यंदा मोठया उत्साहात गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. गणेशौत्सवात आता घरोघरी गौरीईचे (महालक्ष्मी) मोठया थाटात परंपरा राखत आगमन झाले आहे .शहरातील पत्रकार सोमनाथ घोंगाणे यांच्या घरी गौराईचे उत्साहात आगमन झाले. जेष्ठा नक्षत्रावर गौराईची पुजा केली जाते. सकाळी गौराईची पुजा अर्चा करूण आरती केली जाते . यावेळी फराळाचा नैवद्य दाखविला जातो .सर्वाना धन धान्य ‘ऐश्वर्य ‘ आरोग्य लाभो अशी प्रार्थना गौराई कडे केली जाते .३ संप्टेबंर रोजी सुर्योदया पासून सुर्यास्ता पर्यंत गौराईचे आवाहन केले जाते . ४ संप्टेबंर रोजी अनुराधा नक्षत्रावर गौरी पुजन केले जाते . ५ संप्टेबर रोजी पुर्ण दिवस मुळ नक्षत्र असल्याने केव्हाही गौराईचे विसर्जन करता येते. जेष्टा गौरी चे व्रत नक्षत्राशी संबधीत असून जेष्टा नक्षत्रावर आवाहन अनुराधा नक्षत्रावर पुजन व मुळ नक्षत्रावर विर्सजन करण्याची प्रथा आहे. शहरात मोठया प्रमाणावर गौराईची स्थापना केली जाते.

Previous articleकळवण तालुक्यातील देसराणे गावात राज्य उत्पादन शुल्क यांनी हात भट्टी अड्डा केला उद्ध्वस्त.
Next articleग्रामीण बँकेत रोखपाल सुरेश दासरवार रूजू
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.