आशाताई बच्छाव
गडचिरोलीच्या पोस्ट ऑफिस ची सेवा तात्काळ बरखास्त करा
आमदार डॉक्टर देवरावजी होळी गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
गडचिरोलीच्या अकार्यक्षम पोस्ट मास्तरला तातडीने बडतर्फ करा
पोस्टाच्या सेवेची नव्याने रचना करण्याची आवश्यकता
पोस्टाची सेवा अतिशय निकृष्ट दर्जाची ,लिंक नेहमीच बंद राहते, ग्राहकांशी अभद्र व्यवहार, ६-६ महिने लायसन्स पोस्टातच पडून राहते, रेल्वेची तिकीट मिळत नाही ,पत्र वेळेवर मिळत नाही अशी ग्राहकांची खंत
गडचिरोली सारख्या जिल्हा केंद्रावर असणाऱ्या पोस्टाची सेवा अतिशय निकृष्ट दर्जाची असून या पोस्टामधून ग्राहकांचे पत्र वेळेवर पोहोचविले जात नाही, आरटीओ ने पाठवलेल्या लायसन्स ६-६ महिने पोस्टातच पडून राहतात, रेल्वेच्या तिकीट योग्य वेळेत काढली जात नाही, या पोस्टाची लिंक नेहमीच बंद राहते, ग्राहकांशी कर्मचाऱ्यांचा व्यवहार हा अभद्र असतो अशा असंख्य तक्रारी गडचिरोलीच्या पोस्टाच्या असून पोस्टाच्या येथील सेवेला बरखास्त करून नव्याने रचना करण्याची मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केंद्र शासनाकडे केली.
गडचिरोली चे पोस्ट मास्तर अतिशय अकार्यक्षम असून या सर्व तक्रारी त्यांच्या अकार्यक्षमतेमुळेच पुढे आलेल्या आहेत त्यामुळे त्यांना सेवेतून तात्काळ बरखास्त करण्यात यावे अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली आहे.
गडचिरोली हे जिल्हा केंद्र असून या जिल्हा केंद्रावर यापूर्वी रेल्वेचे स्वतंत्र काउंटर होते परंतु स्वतंत्र काउंटर बंद करून ते पोस्ट ऑफिसला देण्यात आले परंतु पोस्टामधून कधीही रेल्वेची लिंक नाही असेच उत्तर देऊन तिकीट धारकांना वडसा रेल्वे स्टेशन येथून तिकीट काढण्यासाठी पाठवण्यात येते.
आरटीओ ऑफिस कडून पोस्टामार्फत लोकांना लायसन्स पाठवली जाते परंतु पोस्टाच्या ऑफिसमध्ये सदर लायसन्स ६-६ महिने पडून राहतात आपल्या लायसन्स बद्दल विचारना करायला जाणाऱ्या लोकांना पोस्टाच्या अधिकाऱ्याकडून, कर्मचाऱ्यांकडून उद्धट वागणूक मिळते. लायसन्स घरी सुद्धा पाठवत नाही व हातात सुद्धा देत नाही इतकी भयानक स्थिती या पोस्टाची झालेली आहे.
लोकांनी पाठवलेले पत्र, शुभेच्छा कार्ड ,पत्रिका पोस्टामार्फत लोकांना योग्य वेळेवर मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. या ठिकाणी नेहमीच कर्मचारी अनुपस्थित राहतात, सुट्टीवर राहतात. पोस्ट ऑफिस ची लिंक नाही अशी नेहमीच पार्टी या पोस्टमध्ये लागून असते त्यामुळे या पोस्ट ऑफिसच्या सेवेचा राहूनहीं काही उपयोग नाही. त्यामुळे ही पोस्ट सेवा बरखास्त करून या ठिकाणी नवीन नव्याने रचना करून व्यवस्था उभारावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केंद्र शासनाकडे केली आहे.