आशाताई बच्छाव
पुणे,हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: दोन वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर राज्यात दहीहंडीचा उत्सव जोमात! राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी कालच दहीहंडी उत्सव निमित्त काही घोषणा केल्या होत्या. त्यानंतर संपूर्ण राज्यभर दहीहंडीचा उत्सव जोमात पार पडतोय. मुंबई ठाणे या शहरांमध्ये दहीहंडीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे. मनोरे पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. नृत्यांच्या आविष्कारात, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उत्साह मध्ये दहीहंडीचा उत्सव साजरा होत आहे. जामोरी मैदानात दहीहंडी फोडली गेली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये टेंभी नाक्यावर शिंदे गटांनी दहीहंडी साजरी केली तेथे एकनाथ शिंदे यांनी सांगितले की आम्ही 50 दहीहंडी फोडल्या. त्याच्यावर प्रत्युत्तर देताना ठाण्यातील दहीहंडी कार्यक्रमात राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. कोण किती दहीहंडी फोडते ते कळलंच अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री वरती टीका केली. कालच्या घोषणानंतर प्रत्येक दहीहंडीला गोविंदाला दहा लाखाचे कव्हरेजचा विमा महाराष्ट्र शासन देणार अशी घोषणा केली होती .मुंबई ,ठाण्यात थरावर थर पाहायला मिळाले . मुंबईमध्ये काही ठिकाणी २४ गोविंद जखमी झाले उपचार नंतर 19 गोविंद घरी परतले. अशा डीजेच्या व गाण्याच्या व संगीताच्या तालावर दहीहंडीचा उत्सव जोरदार पार पडला. मुंबईमध्ये किरीट सोमय्या यांनीही दहीहंडी फोडली. तब्बल दोन वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर दहीहंडीचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात खूप जोमाने पार पडतोय. राज्यातील जनतेने याचा आनंद पुरेपूर घेतला.