Home रत्नागिरी रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनकडून अमित विलणकर यांचा सत्कार

रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनकडून अमित विलणकर यांचा सत्कार

28
0

आशाताई बच्छाव

IMG-20220818-WA0064.jpg

रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनकडून अमित विलणकर यांचा सत्कार

रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):- श्री दत्त सेवा मंडळ या चार वाड्यांच्या देवस्थानच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आल्याबद्दल रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनकडून अमित विलणकर यांचा एकमुखी दत्त मंदिरात बुधवारी सत्कार करण्यात आला. तसेच देवस्थानच्या सर्व पदाधिकार्‍यांना यावेळी गौरवण्यात आले.

रत्नागिरीतील प्रसिद्ध एकमुखी दत्त मंदिराचे नोंदणीकृत मंडळ असलेले श्री दत्त सेवा मंडळ घुडेवठार, पाटीलवाडी, विलणकरवाडी आणि चंवडेवठार या चार वाड्यांमध्ये कार्यरत आहे. रविवारी देवस्थानच्या पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या त्यामध्ये अध्यक्षपदी अमित विलणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. त्यानिमित्ताने रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनकडून अमित विलणकर यांचा भाई उर्फ श्रीकृष्ण विलणकर, डॉ. चंद्रशेखर केळकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. याशिवाय रत्नाकर उर्फ सागर सुर्वे, अजय विनायक विलणकर, विशाल उर्फ शंभू विजय मुंडे, राजेश रामदास बोरकर, पराग विजय विलणकर, मुकूंद रोहिदास विलणकर, राजेंद्र यशवंत घुडे, प्रकाश लक्ष्मण घुडे, मनोज शाम घुढे, सुरेंद्र घुडे, सुमित साईनाथ नागवेकर, अर्चना अशोक मयेकर, प्रेरणा पुरूषोत्तम विलणकर, संकेत सुगंधा चवंडे, शशांक सुरेंद्र चवंडे, किरण जगदीश खडपे यांचाही कुस्ती असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांकडून सत्कार करण्यात आला व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी कुस्ती असोसिएशनचे सदानंद जोशी, आनंद तापेकर, फैय्याज खतिब व संदेश चव्हाण उपस्थित होते.

Previous articleबळीराजाला प्रोत्साहनपर अनुदान- ठाकरे सरकारची केवळ घोषणा, शिंदे- फडणवीस सरकारची ठोस कृती- ॲड दीपक पटवर्धन
Next articleस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बसणी येथे विविध कार्यक्रम
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here