आशाताई बच्छाव
जिंदल विद्यामंदिर प्रशालेत आझादी का अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील जिंदल विद्यामंदिर प्रशालेत स्काऊट गाईड व कब बुलबुल या युनिट मार्फत रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयदीप कलेकर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शाळेतील विदयार्थ्यांनी स्वतः च्या कलाकृतीतून राख्या बनविल्या. त्या राख्या समुदाय मदतनीस यांना देण्यात आल्या. यांमध्ये ईयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
त्यानंतर रॅली काढण्यात आली.
यामध्ये महापुरुषांच्या वेशभूषा करण्यात आल्या. यावेळी जिंदल शाळा ते टाऊनशिप अशी रॅली काढण्यात आली. त्याचबरोबर रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये इयत्ता सहावी ते अकरावी पर्यंत विध्यार्थी सहभागी झाले. या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमासाठी शाळेतील मुख्याध्यापिका सौ. तृप्ती वराठें यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. त्याचं बरोबर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पेद्दना यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.