आशाताई बच्छाव
देशभरात विविध ठिकाणी सर्व भारतीय नागरिकांनी एकोपा दाखवत ७५वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला
नांदगांव प्रतिनिधी-अनिल धामणे
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा व संग्राम महिला बचत गटाच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथे स्वातंत्र्य दिनावर भाषण,लिंबू चमचा, संगीत खुर्ची,गीत गायन, देशभक्ती पर गीत नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माझी नगरसेविका संगीता जगताप तर प्रमुख पाहुणे म्हणून एॅड विद्या कसबे,पत्रकार प्रज्ञानंद जाधव,समाजसेविका शबाना मंसुरी,नेहा कोळगे हे उपस्थित होते
स्पर्धेमध्ये देशभक्तीपर गीत नृत्य, संगीत खुर्ची, लिंबू चमचा, भाषण, स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी विजेत्या स्पर्धकांना आकर्षक पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी ते साठी माता रमाई महिला मंडळ अध्यक्ष रंजना हिरे, संग्राम बचत गट अध्यक्ष जयश्री जगताप ,उषा बागुल ,कमल पवार ,उषा पगारे, सुंदराबाई गरुड ,आशा जगताप कमलाबाई कोतकर, सुमनबाई अहिरे मीना काकळीज, सत्यभामाबाई जगताप, लक्ष्मीबाई बागुन,वैशाली पवार, रंजना जगताप,लहानुबाई हिरे, रेखा जगताप,शीला जगताप, बेबीबाई जगताप ,चंद्राबाई पवार सुपारी बाई, महीरे बाई ,केराबाई पवार आदी उपस्थित होते सूत्रसंचालन जयश्री जगताप यांनी केले व आलेल्या मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.