Home वाशिम ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा असे शिवसेनेच्या वतीने उपविभागीय...

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा असे शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन

53
0

आशाताई बच्छाव

IMG-20220814-WA0001.jpg

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा असे शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन                      वाशिम,(रितेश गाडेकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

मागील महिन्या भरापासून राज्यात मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे मंगरूळपीर तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही नदीकाठची व नाल्या काठची शेती खरडून गेली तर काही शेतातील पीक वाहून गेले. अशा बऱ्याच अडचणीमुळे शेतकरी मेटाकुटीस आलेला असून, शेतकऱ्यांना राज्य शासनाने तात्काळ मदत करावी. याकरिता मंगरूळपीर तालुका शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. मागील चार-पाच दिवसापासून मंगरूळपीर तालुक्यात मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांची शेती खरडून वाहून गेली आहे. तर काही शेतकऱ्यांची पीक संपूर्ण नष्ट झालेले आहे. तसेच काही शेतकऱ्यांचे पीक पाण्यामुळे पिवळी पडलेली आहे. मागील दोन महिन्यापासून लहान मुलासारखं तळहातावर सांभाळलेल्या या पिकाची आज ही अवस्था पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू वाहायला सुरुवात झालेली आहे. या पावसासारखा आता शेतकऱ्यांचाही सहयमांचा बांध फुटलेला दिसून येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या सर्व गोष्टीचा विचार करून तात्काळ शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत जाहीर करावी, अशी मागणी शासन दरबारी शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच तालुक्यातील मोझरी येथे 4 ते 6 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसामुळे मोझरी गावा नजीकच्या पुला भवताल खोदलेल्या अनधिकृत नाल्यामुळे पुलाचे पाणी मोझरी गावात घुसले. तसेच शेतकऱ्यांच्या पिकात पुरांचे पाणी घुसल्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले. या पुलाचे उभारणी करताना काही चुका असल्याचे तेही संबंधित विभागाने तात्काळ चौकशी करून या पुलांचे मोजमाप करून योग्य ते नाल्यांची उभारणी करावी व शेतकऱ्यांच्या पिकांचे रक्षण करावे अशी मागणी शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रामदास पाटील सुर्वे, बबनराव सावके, सचिन डोफेकर,पं.स.सदस्य बंडू वैद्य,पं.स. उपसभापती विलास लांभाडे, प्रकाश अपूर्वा, विनोद वैद्य, बाळकृष्ण रोकडे, सचिन राऊत, गजानन सुर्वे, गोपाल सुर्वे, सुभाष राऊत, विजय भुरे, विजय शेळके, सिद्दीक शहा, गणेश मुळे, गजानन राऊत, सचिन सोनवणे, यासह बहुसंख्य शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.

Previous articleनांदेडला छावाचा ओला दुष्काळ जाहिर करण्यासाठी बैलगाडी मोर्चा
Next articleमा.ना.सुधिरभाउ मुनगंटिवार जी यांचे गडचिरोली-चिमुर लोकसभे तर्फे हार्दिक स्वागत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here