Home नाशिक नांदगाव तालुक्यात रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न. 

नांदगाव तालुक्यात रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न. 

58
0

आशाताई बच्छाव

IMG-20220813-WA0072.jpg

नांदगाव तालुक्यात रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न.                                                             नांदगांव प्रतिनिधी अनिल धामणे                    जागतिक आदिवासी दिनानिमित्त दि.9ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत रानभाज्या महोत्सव सप्ताह साजरा करण्यात येतो.त्या अनुषंगाने नांदगाव तालुक्यात दि.12 ऑगस्ट 2022 रोजी वन्य भाजीपाला संवर्धानातुन आदिवासी सक्षमीकरणाची संकल्पना अंगीकारण्यांच्या उद्देशाने कृषि विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने इतर प्रशासकीय इमारत, तालुका कृषी अधिकारी नांदगाव, कार्यालय येथे मा.आमदार,श्री.सुहासजी कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन श्री.दिलीप देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी मालेगाव,श्री.गणेश चौधरी,गट विकास अधिकारी, पंचायत समिती नांदगाव,श्री.बाळासाहेब कवडे व श्री.किशोर लहाने, शेतकरी सल्ला समिती सदस्य, नांदगाव,श्री.जगदीश पाटील, तालुका कृषी अधिकारी नांदगाव इ. मान्यवरांच्या हस्ते लाल फित कापुन करण्यात आले.सदर महोत्सवात तालुक्यात नैसर्गिकरीत्या आढळणाऱ्या विविध रानभाज्या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या त्यामध्ये मुख्य: तांदूळजा,काठेमाठ,गुळवेल, आघाडा,बेल, कढीपत्ता,उंबर, पिंपळ,कुरडु,अळु,अंबाडी,फांग, करडई,केणा,सराटा,अंबोशी,भुईआवळा,टाकळा,आवळा,लाल माठ,चिवळ,शेवगा पाला,पाथरी, कुंदरु,दिंडा इत्यादी रानभाज्यांच्या समावेश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.राजेंद्र काळे, कृषी पर्यवेक्षक यांनी केले.श्री.जगदीश पाटील, तालुका कृषि अधिकारी नांदगाव यांनी रानभाज्या महोत्सवाचा उद्देश व रानभाज्यांचे मानवी आहारातील महत्त्व याबाबत माहिती दिली. त्यानंतर श्री.गणेश चौधरी, गटविकास अधिकारी पंचायत समिती, नांदगाव यांनी अशा प्रकारच्या रानभाज्या या दर आठवडी बाजारात विक्री ठेवल्यास ग्राहकांना त्याबाबत माहिती होवुन रानभाज्या विक्री होण्यास संधी उपलब्ध होतील असे मत व्यक्त केले. श्री.बाळासाहेब कवडे, शेतकरी सल्ला समिती सदस्य नांदगाव यांनी तालुका स्तरावर अशा प्रकारचे रानभाज्या महोत्सव आयोजित केल्याबद्दल कृषि विभागांच्या अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले.त्यानंतर श्री.किशोर लहाने,शेतकरी सल्ला समिती सदस्य नांदगाव यांनी शेतकऱ्यांना कृषि बाजार समितीच्या परिसरामध्ये दर रविवारी रानभाज्या विक्री साठी जागा उपलब्ध करून देवु असे आश्वासीत केले.तसेच रानभाज्यांबाबतचे औषधी गुणधर्म ,महत्त्व व त्यांचे पाक कला कृती तयार करणे, याबाबत शहरी भागातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्यास यामधुन उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध होवु शकते असे मत व्यक्त केले.त्यानंतर श्री.दिलीप देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी मालेगाव यांनी रानभाज्यांमध्ये रोग प्रतिकारक शक्तीत वाढ होत असल्याने रानभाज्या ह्या केवळ प्रदर्शनात न मांडता त्याची मोठ्या प्रमाणात लागवड होवुन त्या नियमीत आठवडे बाजारामध्ये शहरी ग्राहकांना विक्री साठी कशाप्रकारे उपलब्ध करुन देता येतील व यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात कशाप्रकारे वाढ करता येईल याबाबत मार्गदर्शन केले.तसेच या रानभाज्या मध्ये विविध गुणधर्म असल्याने त्या अनेक आजारांवर जसे की, कॅन्सर, आम्लपित्त, मधुमेह,कप,ताप ,पोटाचे विकार इ.आजारांवर औषधी गुणधर्म आहेत. त्यानंतर जगदीश पाटील, तालुका कृषी अधिकारी नांदगाव या़नी सर्व उपस्थित मान्यवर,शेतकरी यांचे आभार मानुन कार्यक्रमाचा,समारोप करण्यात आला

Previous articleझाडीच्या नेहरुनगर शाळेत विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण
Next articleनांदेडला छावाचा ओला दुष्काळ जाहिर करण्यासाठी बैलगाडी मोर्चा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here