आशाताई बच्छाव
खा.अशोकजी नेते यांच्या पाठपुराव्याने व प्रयत्नांने अनेक रेल्वेचे प्रश्न मार्गी लागणार…
रेल्वे नविन लाईनला मंजुरी.
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-आष्टी-आलापल्ली-सिरोंचा-मंचेरियाल-आदिलाबाद आणि नागभीड-कांपा-टेम्पा चिमूर-वरोरा या नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी मंजुरी…..
मान.श्री. अश्विनी वैष्णव, मंत्री, रेल्वे,दळणवळण, आणि माहिती भारत सरकार, नवी दिल्ली येथे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करून निवेदनाद्वारे मागणी केली.
गडचिरोली चिमुर लोकसभेच्या क्षेत्रांतर्गत रेल्वे संदर्भात केंद्रशासनाला सतत केलेल्या पाठपुराव्याने व प्रयत्नाने रेल्वेचे प्रश्न मार्गी लावणारे एकमेव खा.अशोकजी नेते
यांचा लोकसभा मतदारसंघ हा गडचिरोली-चिमूर हा अनेकशे कि.मी. क्षेत्रफळानुसार देशातील सर्वात मोठा आदिवासी संसदीय मतदारसंघ आहे. हा भाग अत्यंत मागासलेला आणि आदिवासी बहुल नक्षलग्रस्त दुर्गम आणि अविकसित क्षेत्र आहे.
खासदार साहेबाच्या पाठपुराव्याने व केलेल्या प्रयत्नाने रेल्वेचे अनेक प्रश्न मार्गी लागल्याने गडचिरोली-आष्टी-आलापल्ली-सिरोंचा-मंचेरियाल-आदिलाबाद आणि नागभीड-कंपा-टेम्पा चिमूर-वरोरा या नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी मंजुरी देण्यात आली आहे. मात्र आजतागायत यासाठी निधी देण्यात आलेला नाही.त्यामुळे सदर नव्याने मंजूर झालेल्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करावे.नागपूर उमरेड – नागभीड या ब्रॉडगेजच्या बांधकामाच्या कामात कानपा- चिमूर – वरोरा या ब्रॉडगेजच्या बांधकामाचा समावेश करून निधीचे वाटप माझ्या लोकसभा मतदारसंघातील चिमूर, जिल्हा चंद्रपूर परिसर हा स्वातंत्र्यलढ्याचा केंद्रबिंदू राहिला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने 1942 मध्ये सुरू झालेल्या चिमूर क्रांतीमध्ये थोर स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांना जर्मनीच्या बर्लिन रेडिओवरून त्यांनी स्वतंत्र घोषित केले होते. मात्र या ऐतिहासिक स्थळाचा विकास अद्यापही रखडला आहे. औद्योगिक चंद्रपूर जिल्ह्यातील कानपा-चिमूर-वरोरा ब्रॉडगेजच्या बांधकामामुळे विकासाला चालना मिळणार आहे.
या भागातील ताडोबा अंधारी राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पामुळे पर्यटनाला आणखी चालना मिळणार आहे.त्यामुळे प्रगतीपथावरील रेल्वे नागपूर-उमरेड-नागभीड ब्रॉडगेजच्या कामाबरोबरच कानपा-चिमूर-वरोरा या नवीन ब्रॉडगेजचा समावेश करून निधीचे वाटप करावे याकरीता मा.श्री.अश्विनी वैष्णव मंत्री, रेल्वे, दळणवळण आणि माहिती भारत सरकार नवी दिल्ली येथे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करून निवेदनाद्वारे मागणी केली.यासाठी गडचिरोली चिमुर लोकसभेच्या क्षेत्रांतर्गत नेहमी रेल्वे संदर्भात केंद्र शासनाला सतत केलेल्या पाठपुराव्याने व प्रयत्नाने अनेक प्रश्न मार्गी लावणारे एकमेव खासदार अशोकजी नेते.