Home रत्नागिरी गणपतीपुळे येथे स्वच्छता अभियान

गणपतीपुळे येथे स्वच्छता अभियान

77
0

आशाताई बच्छाव

IMG-20220812-WA0031.jpg

गणपतीपुळे येथे स्वच्छता अभियान

रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत ग्रामपंचायत गणपतीपुळे, पर्यटक निवास गणपतीपुळे, संस्थान श्रीदेव गणपतीपुळे पर्यटन व्यवसायिक संघटना, बचत गट लंबोदर महिला ग्राम संघ, रिक्षा चालक मालक संघटना, ग्रामस्थ व संघटना यांचेतर्फे संपूर्ण गणपतीपुळे गावामध्ये ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यामध्ये आपटा तिठा ते बस स्थानक, सूर्वे स्टॉप ते प्राचीन कोकण, कोल्हटकर तीठा ते शासकीय विश्रामगृह, आपटा तिठा ते मोरया चौक तसेच मोरया चौक ते रानडे रोड या रस्त्याची साफसफाई करण्यात आली.

या सर्व ठिकाणचा जमलेला कचरा प्लास्टिक तसेच टाकाऊ पदार्थ व वस्तू ग्रामपंचायतीच्या घंटागाडी गाडीने उचलण्यात आले. त्यांची योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या ग्रामस्वच्छता अभियानासाठी सरपंच कल्पना पकये, उपसरपंच महेश केदार, ग्रामसेवक प्रवीण चौधरी, ग्रामपंचायत सदस्य संजय माने, शुभांगी ठावरे, सारिका भिडे, मृणाल घनवटकर, पर्यटन व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष प्रमोद केळकर, पर्यटक निवास गणपतीपुळे सहाय्यक व्यवस्थापक रुपेश करंडे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, पर्यटक निवास गणपतीपुळे कर्मचारी, संस्थान श्रीदेव गणपतीपुळे कर्मचारी, ग्रामस्थ आदींनी विशेष मेहनत घेतली.

Previous articleमालगुंड प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेजच्यावतीने “हर घर तिरंगा” अभियाना अंतर्गत प्रभात फेरी
Next articleग्रुप ग्रामपंचायत कोतवडे येथे “हर घर तिरंगा” अभियान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here