Home रत्नागिरी खालगाव ग्रामपंचायतीतर्फे महिला बचत गटाला पत्रावळीचे मशीन तर शेतकरी गटाला नांगरणी मशीनचे...

खालगाव ग्रामपंचायतीतर्फे महिला बचत गटाला पत्रावळीचे मशीन तर शेतकरी गटाला नांगरणी मशीनचे वाटप खालगावात बाईक रॅली ठरली लक्षवेधी

56
0

आशाताई बच्छाव

IMG-20220811-WA0076.jpg

खालगाव ग्रामपंचायतीतर्फे महिला बचत गटाला पत्रावळीचे मशीन तर शेतकरी गटाला नांगरणी मशीनचे वाटप खालगावात बाईक रॅली ठरली लक्षवेधी

रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- तालुक्यातील खालगाव ग्रामपंचायतीतर्फे खालगाव-जाकादेवी परिसरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅली शेकडो स्त्री-पुरुषांनी सहभाग दर्शवून ही रॅली यशस्वीरित्या संपन्न केली. यावेळी विविध विकास कामांचे भूमीपूजन खालगाव ग्रामपंचायतचे धडाडीचे सरपंच प्रकाश खोल्ये, उपसरपंच कैलास खेडेकर तसेच ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, गावकर, प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जाकादेवी बोअरवेल, जाकादेवी गटार बांधणीचे, खालगाव गोताडवाडी नळपाणी दुरुस्तीचे, खालगाव सुतारवाडी नळपाणी, धाऊलवाडी नवीन नळपाणी योजनांचे श्रीफळ वाढवून भूमीपूजन करण्यात आले.

ग्रामपंचायत खालगावतर्फे खालगाव महिला बचत गटाला पत्रावळ मशीन वाटप तसेच खालगाव शेतकरी गटाला नांगरणी मशीनचे वाटप सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी,तलाठी, सर्कल गावकर, महिला यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.यावेळी वार्डनुसार अध्यक्ष यांचेकडे सन्मानाने ध्वज वितरित करण्यात आले.

भव्य बाईक रॅलीचे आयोजन खालगाव ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले होते. ही रॅली यशस्वी करण्यासाठी गावातील अनेक नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.थोर देशभक्त, क्रांतिकारक यांची स्फुर्तिदायक देशभक्तीपर गीते रॅलीत लक्षवेधी ठरली. विकास कामांचे भूमीपूजन आणि मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी गावचे सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायतीचे सर्व सक्रिय सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, गावकर, सामाजिक कार्यकर्ते, युवक, बचत गट, प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, कर्मचारी, महिला, ग्रामपंचायत खालगाव कार्यालयीन कर्मचारी, शासकीय व निमशासकीय कर्मचारी ग्रामीण पोलीस स्टेशनचे आणि खालगावचे बीट अंमलदार किशोर जोशी व त्यांचे सहकारी यांनी मौलिक योगदान दिले. अमृतमहोत्सवी राष्ट्रीय उपक्रमात सामाजिक बांधिलकीने सहभागी झालेल्या नागरिकांना खालगाव ग्रामपंचायतीतर्फे धन्यवाद देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here