
आशाताई बच्छाव
अखिल भारतीय छावाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे 12 ऑगस्ट रोजी बैलगाडी मोर्चाचे आयोजन
मुखेड तालुका प्रतिनिधी
संग्राम पाटील तांदळीकर
ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी अखिल भारतीय छावाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय शुक्रवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी धडक बैलगाडी मोर्चा काढण्यात येणार आहे असे अ भा छावाचे युवा तालुकाध्यक्ष गिरीधर पाटील शिंदे केरुरकर यांनी सांगितले,आज पर्यंत शेतकऱ्यांना पुळका दाखवणारे लोकप्रतिनिधी विकासाच्या गप्पा मारणारे सरकार मंत्री पदात मग्न आहेत हे राजकीय पुढारी शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आज बळीराजावर उपासमारीची वेळ आली व बळीराजाला आत्महत्या करणे हाच पर्याय शिल्लक राहिला असून बळीराजाला विविध मागण्यासाठी झोपेचे सोंग घेतलेल्या राजकीय पुढारी व प्रशासनास जागे करण्यासाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे तरी शेतकरी बांधवांनी या बैलगाडी मोर्चा हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे
प्रमुख नेतृत्व मा. नानासाहेब जावळे पाटील
केंद्रीय कार्याध्यक्ष अ भा छावा
मा विजयकुमार घाडगे पाटील
प्रदेश अध्यक्ष वि आ
मा पंजाबराव काळे पाटील
प्रदेश अध्यक्ष
मा माधवराव ताटे पाटील
जिल्हाध्यक्ष नांदेड
मा दशरथ कपाटे पाटील
जिल्हाध्यक्ष नांदेड