Home रत्नागिरी राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसे जिल्हाध्यक्ष पदी पुन्हा जितेंद्र चव्हाण

राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसे जिल्हाध्यक्ष पदी पुन्हा जितेंद्र चव्हाण

53
0

आशाताई बच्छाव

IMG-20220809-WA0060.jpg

राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसे जिल्हाध्यक्ष पदी पुन्हा जितेंद्र चव्हाण                                           रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांना पुन्हा राज ठाकरे यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष पदी संधी देण्यात आली आहे. तसेच चिपळूण तालुक्याचे माजी तालुकाध्यक्ष संतोष नलावडे यांची जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जिल्हा संपर्क अध्यक्ष सतीश नारकर यांच्या उपस्थितीत या दोघांनाही नियुक्ती पत्र देण्यात आली. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील मनसैनिक उपस्थित होते.

संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावचे सुपुत्र जितेंद्र चव्हाण यांच्या जागी अविनाश सौंदलकर यांची दोन महिन्यांपूर्वी जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली होती. चव्हाण यांना जिल्हाध्यक्ष पदावरून बदलण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता व नाराजीचा सूर उमटला होता. त्यानंतर तात्काळ जितेंद्र चव्हाण यांची महाराष्ट्र् नवनिर्माण नाविक सेनेच्या महाराष्ट्र सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली होती, त्यामुळे मनसैनिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लक्षात घेता
पक्षाला उभारी देण्यासाठी जिल्ह्याचे भौगोलिक परिस्थिचा विचार करता दक्षिण, मध्य व उत्तर असे तीन भाग करून काम करणे सोपे व्हावे याकरिता वरिष्ठ पातळीवरून हा निर्णय घेतला गेल्याचे समजते.

दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष पदी अविनाश सौंदलकर यांचेकडे लांजा, राजापूर व रत्नागिरी या तिन तालुक्यांची जबाबदारी देण्यात आल्यानंतर आता जितेंद्र चव्हाण यांचेकडे संगमेश्वर, चिपळूण व गुहागर या तीन तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे तर लवकरच खेड, दापोली व मंडणगड या तीन तालुक्यासाठी नविन जिल्हाध्यक्षाची नियुक्ती केली जाईल असे बोलले जात आहे.

जितेंद्र चव्हाण यांची मध्य रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याचवेळी चिपळूणचे माजी तालुकाध्यक्ष संतोष नलावडे यांनाही मध्य रत्नागिरी जिल्हासचिव पदावर बढती देण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी दिलेल्या संधीचे आपण सोने करू व राजकीय गटतट व हेवेदावे दूर करून पक्षाला नवी उभारी देण्यासाठी आपण काम करू अशी ग्वाही जिल्ह्याध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी दिली आहे. मध्य रत्नागिरी बरोबरच जिल्ह्यात पक्ष वाढवण्यासाठी आपल्या सर्व सहकाऱ्यांसोबत आपण प्रयत्नशील राहू असेही चव्हाण यांनी सांगितले.

Previous articleपुराच्या पाण्याचा खाडीभागातील सुमारे पंधरा ते सोळा गावांना वेढा !
Next articleकळंबस्ते हायस्कूलमध्ये हर घर तिरंगा अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here