Home पालघर हर घर तिरंगा रन मध्ये विध्यार्थी आणि नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग

हर घर तिरंगा रन मध्ये विध्यार्थी आणि नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग

43
0

आशाताई बच्छाव

IMG-20220806-WA0039.jpg

हर घर तिरंगा रन मध्ये विध्यार्थी आणि नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग

पालघर,(वैभव पाटील ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त विध्यार्थी आणि नागरिकांसाठी हर घर तिरंगा रन दैड आयोजित करण्यात आली होती या दैड मध्ये जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी 10 कि. मीची दौड पूर्ण करताच नागरिकांनी टाळ्या वाजून त्यांचे स्वागत केले.
हर घर तिरंगा रन मध्ये 1 हजार 5 00 विध्यार्थी आणि नागरिकांनी सहभाग नोंदवीला
जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जील्हा परिषद व शिक्षणाधिकारी कार्यालय , पालघर यांच्या संयुक्त विद्यमानाने सदर दौड आयोजित करण्यात आली होती
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा , आमदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी , शिव छत्रपती क्रीड़ा गटशिक्षण अधिकारी श्री.मोहीते,यांनी सक्रिय सहभाग नोंदवला स्वांतत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षा निमित्त घरो घरी तिरंगा रन स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील,16 वर्षाखालील 18 वर्षाखालील विध्यार्थी आणि नागरिकांसाठी खुलागट अशा चार गटामध्ये स्पर्धा पार पडली
या स्पर्धे मध्ये अनुक्रमे 2 कि मी, 4 कि मी,6 कि मी आणि 10 कि. मी अंतराची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
प्रथम सहा क्रमांकांना रोख रक्कम व पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले तसेच
स्पर्धा यशस्वी पूर्ण करणाऱ्या प्रत्येक खेळाडूना सहभाग प्रमाणपत्र देखील मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here