Home सोलापूर गुंठेवारी खरेदी विक्री व्यवहारास परवानगी द्या

गुंठेवारी खरेदी विक्री व्यवहारास परवानगी द्या

63
0

आशाताई बच्छाव

IMG-20220806-WA0028.jpg

गुंठेवारी खरेदी विक्री व्यवहारास परवानगी द्या

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मागील अनेक महिन्यापासून महाराष्ट्र सरकारने गुंठेवारी खरेदी विक्रीस निर्बंध घातल्याने लाखो मिळकत धारक अडचणीत सापडले असून त्यांची फार मोठी आर्थिक कोंडी झालेली आहे सोलापूर शहरातील हद्द वाढ भागातील जवळपास 90% पेक्षा जास मिळकती गुंठेवारीच्या आहेत मागील अनेक महिन्यापासून राज्य सरकारने गुंठेवारी खरेदी- विक्री व्यवहारला मनाई व प्रतिबंध केल्याने हद्दवाढ भागातील नागरिकांना अनेक आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असून हद्दवाढ भागातील गुंठेवारी मिळकतीच्या खरेदी विक्री वर प्रतिबंध लावल्याने राज्य सरकारच्या कोट्यावधी महसूल बुडत असून यापूर्वी राज्य सरकारनेच हद्दवाढ भागातील गुंठेवारी खरेदी विक्री करण्यास परवानगी दिल्याने या भागातील लोकांनी विविध बँका पतसंस्था खाजगी सावकार तसेच घरातील मौल्यवान वस्तू गाहाण ठेवून या भागा मिळकती खरेदी केल्या आहेत
आधार घ्यावा लागत असून जनतेच्या मूलभूत हक्कावर राज्य सरकारने संक्रात आणल्याने मिळकत धारकांमध्ये प्रचंड संतापची लाट उसळली आहे त्याचबरोबर दस्त नोंदणी बंद असल्याने राज्य सरकार चा कोट्यावधी महसूल खरेदी बुडत असून लाखो रुपयांच्या मिळकती कवडीमोल होत आहेत अनेक अडचणी असल्यामुळे मिळकत धारक नोटरी व्यवहाराने अत्यंत कमी किमतीत या मिळकतीच्या विक्री होत आहेत* हद्दवाढ भागातील गुंठेवारी खरेदी -विक्री व्यवहार बाबत मा जिल्हाधिकारी यांनी राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून मान्यता मिळवून घ्यावी अशी मागणी ग्राहक कल्याण फाउंडेशन सोलापूर जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here