Home रत्नागिरी देव-घैसास-कीर महाविद्यालयात गोस्वामी तुलसीदास जयंती साजरी

देव-घैसास-कीर महाविद्यालयात गोस्वामी तुलसीदास जयंती साजरी

52
0

आशाताई बच्छाव

IMG-20220805-WA0037.jpg

देव-घैसास-कीर महाविद्यालयात गोस्वामी तुलसीदास जयंती साजरी                                                     रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

रत्नागिरीतील भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात हिंदी विभागाकडून हिंदी साहित्य कवी गोस्वामी तुलसीदास जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविकातून हिंदी विभागप्रमुख कस्तुरी मोहित यांनी तुलसीदास यांचा जीवन परिचय सांगितला. महाविद्यालयीन प्रथम, द्वितीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी श्री रामचरित मानस हे गीत प्रस्तूत केले.

योगिनी बापट, भक्ती कांबळे, सौरभ यादव, संजय वसावे या विद्यार्थ्यांनी तुलसीदास यांचे दोहे अर्थासहित सांगितले. कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ.मधुरा पाटील, उपप्राचार्या सौ. वसुंधरा जाधव, कला विभाग प्रमुख सौ. ऋतुजा भोवड, मराठी विभागप्रमुख सौ.अनन्या धुंदूर, हिंदी विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृती शेडबाळे हिने केले. विराज पंडित यानी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here