• Home
  • पोषण आहाराचं हे चाललय तरी काय विद्यार्थ्याच्या पोषण आहारामध्ये सापडली अळी

पोषण आहाराचं हे चाललय तरी काय विद्यार्थ्याच्या पोषण आहारामध्ये सापडली अळी

आशाताई बच्छाव

IMG-20220805-WA0036.jpg

पोषण आहाराचं हे चाललय तरी काय विद्यार्थ्याच्या पोषण आहारामध्ये सापडली अळी                          रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

रत्नागिरीत शालेय पोषण आहाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आधी कच्चा भात आणि पाण्यासारखे वरण विद्यार्थ्यांना खायला दिले आता तर विद्यार्थ्यांना ताटात जेवणातून आळी सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीच आली आहे. याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
रत्नागिरी शहरांमध्ये सेंट्रलाइज किचन पद्धत शालेय पोषण आहारासाठी वापरण्यास सुरुवात झाल्यापासून पोषण आहाराचा योग्यते बाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत गुरुवारी शहरातील पटवर्धन हायस्कूल मधील एका मुलाच्या पोषण आहारामध्ये अळी सापडल्याने खळबळ उडाली आहे दरम्यान याबाबत शाळा प्रशासन नगरपरिषद व शिक्षण विभागाला तक्रार अर्ज देणार आहे.

दोन दिवसांपूर्वीच शहरातील शिर्के प्रशालेत मुलांना कच्चा भात आणि पाण्यासारखे वरण जेवणाच्या ताटातून देण्यात आले हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शालेय पोषण आहाराचा प्रश्न किती गंभीर आहे याचे विदारक चित्र सर्वांसमोर आले सेंट्रलाइज पद्धतीने पोषण आहाराचे ठेके पर जिल्ह्यातील तीन संस्थांना देण्यात आले आहेत. केंद्र सरकारने घातलेल्या जाचकटीमुळे हे ठेके पर गेले आणि रत्नागिरी शहरातील शालेय पोषण आहाराचा प्रश्न गंभीर बनला आहे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आणि नगरपरिषद प्रशासनाला पोषण आहाराची पाहणी करून स्पष्ट अहवाल मागवला आहे.

गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांचे उपस्थितीत एक पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड, पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहित कुमार गर्ग आदी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर बी एन पाटील यांनी संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून हा ठेका रद्द करण्याच्या संदर्भात लवकरच निर्णय होईल असे स्वतः त्यांनी यावेळी केले.

दरम्यान पटवर्धन हायस्कुल येथील गुरुकुल मध्ये हा प्रकार उघडकीस आल्याने आता विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देऊच नका अशी भूमिका पालक वर्गातून घेतली जात आहे.

anews Banner

Leave A Comment