Home गडचिरोली कावड यात्रेचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले पूजन व स्वागत

कावड यात्रेचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले पूजन व स्वागत

61
0

आशाताई बच्छाव

IMG-20220803-WA0023.jpg

कावड यात्रेचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले पूजन व स्वागत

सुंदरकांड मंडळ व मित्रपरिवार गडचिरोली तर्फे गडचिरोली वरून मार्कंडा देव करिता कावड यात्रेचे आयोजन                                                           गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

कावड यात्रेत भाविक-भक्त , महिला, बाल, गोपाल यांचा समावेश

दिनांक ३ ऑगस्ट २०२२ गडचिरोली

सुंदरकांड मंडळ व मित्रपरिवार गडचिरोली तर्फे गडचिरोली वरून मार्कंडा देव करिता निघालेल्या कावड यात्रेचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी चामोर्शी येथे पूजन करून स्वागत केले

यावेळी आमदार महोदय कावड पकडुन यात्रेत सहभागी झाले .काल रात्री या कावडयात्रे मध्ये शिवणी येथे सहभागी होवून कावडधारी भाविकांच्या सोबत हर हर महादेव च्या गजरावर नृत्य ही केले

मागील काही वर्षांपासून गडचिरोली येथील सुंदर कांड मंडळ व मित्रपरिवाराच्या वतीने गडचिरोली ते मार्कंडा कावड यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी देखील या यात्रेचे आयोजन करण्यात आले.२ ऑगस्ट ला दुपारी ४ वाजता दुर्गा माता मंदिरातून विधिवत पूजाअर्चा करून ही यात्रा मार्कंडादेव साठी रवाना झाली. या यात्रेमध्ये गडचिरोलीतील असंख्य भाविक भक्त ,तरुण युवक, महिला, बाल, गोपाल सहभागी झाले आहेत. गडचिरोली पासून मार्कंडा देवपर्यंत कावड पकडुन पायी यात्रा अशी ही कावड यात्रा आयोजीत करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here