Home कृषिसंपदा पीएम किसान योजना : ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 4000 रुपये, ‘या’ तारखेला येणार...

पीएम किसान योजना : ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 4000 रुपये, ‘या’ तारखेला येणार 12वा हप्ता..?

244

आशाताई बच्छाव

IMG-20220803-WA0039.jpg

पीएम किसान योजना : ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 4000 रुपये, ‘या’ तारखेला येणार 12वा हप्ता..?
(युवराज देवरे युवा मराठा न्यूज नेटवर्क)
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली होती.. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये केंद्र सरकारतर्फे दिले जातात.. आतापर्यंत या योजनेचे 11 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत..
केंद्र सरकार प्रत्येक हप्त्यात 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर थेट वर्ग करीत असते.. देशातील 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर 31 मे रोजी पीएम किसान योजनेचा (PM Kisan scheme) 11वा हप्ता वर्ग करण्यात आला होता. मात्र,
दोन महिने उलटूनही अनेक शेतकऱ्यांना हे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे हे पैसे मिळणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे..
अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. लवकरच केंद्र सरकारतर्फे पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता जारी केला जाणार आहे.. मात्र, ज्या शेतकऱ्यांना 11 व्या हप्त्याचेच 2,000 रुपये मिळालेले नाहीत, अशा शेतकऱ्यांना 11 व्या आणि 12 व्या हप्त्याचे पैसे एकाच वेळी देण्यात येणार आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या खात्यात दोन्ही हप्त्याचे प्रत्येकी 2 हजार, असे एकूण 4000 रुपये एकदम मिळणार असल्याचे सांगण्यात आले..
बारावा हप्ता कधी येणार…?
सध्या शेतकऱ्यांना 12व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे.. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला 12व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जाण्याची शक्यता आहे.. त्यावेळी ज्यांना 11व्या हप्त्याचे पैसे मिळालेले नसतील, त्यांना एकाच वेळी 4000 रुपये दिले जाणार आहेत..
दरम्यान, अनेक बाेगस लाेकांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यातून सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालीय.. अशा शेतकऱ्यांकडून आतापर्यंत घेतलेल्या पैशांची वसूली सुरु करण्यात आली आहे.. अशा लोकांना पैसे परत करण्याबाबत नोटिसा बजावल्या जात आहेत. पैसे परत न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आलाय..

Previous articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी. पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने केले होते आयोजन.
Next articleकावड यात्रेचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले पूजन व स्वागत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.