Home गडचिरोली गडचिरोली शहरात रामनगर वार्डात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने खळबळ

गडचिरोली शहरात रामनगर वार्डात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने खळबळ

54
0

आशाताई बच्छाव

IMG-20220728-WA0050.jpg

गडचिरोली शहरात रामनगर वार्डात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने खळबळ
गडचिरोली (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
गडचिरोली शहर ते पोटेगाव बायपास मार्गावरील जीलानी बाबा दर्गाच्या बाजुला हजारे आटाचक्की कडे जाणाऱ्या रस्त्यालगत नालीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने गडचिरोली शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मृतक व्यक्तीचे अंदाजे वय ३० ते ३५ असावे.
सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले व पंचनामा करण्यात आला. मृत व्यक्तीची ओळख अद्याप झालेली नाही मृतकाच्या शरीरावर व कपाळावर धारधार शस्त्राने मार आहे तसेच कमरेला व मागच्या बाजुने मार आहे. सदर व्यक्तीची हत्या करून मृतदेह हा मारेकऱ्यांनी रात्रीच्या सुमारास नालीत टाकल्याची चर्चा आहे .
सदर मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून उत्तरीय तपासणीकरिता व शवविच्छेदना करिता जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे व सदर मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे .

Previous articleदेवळा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे तिन्ही गट आरक्षित झाल्याने इच्छुंकाच्या पुर्वतयारीवर फिरले पाणी!
Next articleमहागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले;जीवन जगण्यासाठी गृहिणींना करावी लागतेय कसरत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here