Home नांदेड मुखेड तालुक्यातील मौजे बेनाळ येथे बस सेवा चालू करण्यात यावी-श्रीकांत काळे

मुखेड तालुक्यातील मौजे बेनाळ येथे बस सेवा चालू करण्यात यावी-श्रीकांत काळे

29
0

आशाताई बच्छाव

IMG-20220726-WA0052.jpg

मुखेड तालुक्यातील मौजे बेनाळ येथे बस सेवा चालू करण्यात यावी-श्रीकांत काळे
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड-तालुक्याच्या ठिकाणाहून मौजे बेनाळ गाव अंदाजे ६० कि.मी.च्या अंतरावर असून कर्नाटक राज्याच्या सिमे शेजारी आहे. सदरील गावाची लोकसंख्या बरीच असल्याने गावातील नागरिकांना दळणवळणासाठी, शासकीय कामासाठी, शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मुक्रामाबाद येथे १५ ते २० किलोमीटर अंतर पार करून जावे लागते. सदरील प्रवास हा एस.टी. बस नसल्याने खाजगी वाहनाने नाईलाजास्तव जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. शालेय विद्यार्थ्यांना मुक्रामाबाद येथे एस.टी. बसने प्रवास केल्यास कमी शुल्कात सुविधा मिळेल. गावातील नागरिकांना तालुक्याच्या तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन गावी परतताना एस.टी. बसची सुविधा नसल्याने अंधाऱ्या रात्री पायपीट करीत गाव गाठवावा लागतो. मौजे बेनाळ येथे मुक्कामी बस चालू करून ग्रामस्थांची तसेच शालेय विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळावी.अशा आशयाचे निवेदन श्रीकांत काळे सह समस्त ग्रामस्थांच्या वतीने आगार प्रमुख मुखेड यांना देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here