Home गडचिरोली संपूर्ण महाराष्ट्रातील निराधारांचे मानधन देण्यासाठी मायनस बीडीएस पद्धती ला परवानगी द्या आमदार...

संपूर्ण महाराष्ट्रातील निराधारांचे मानधन देण्यासाठी मायनस बीडीएस पद्धती ला परवानगी द्या आमदार डॉ देवरावजी होळी

89
0

आशाताई बच्छाव

IMG-20220716-WA0038.jpg

संपूर्ण महाराष्ट्रातील निराधारांचे मानधन देण्यासाठी मायनस बीडीएस पद्धती ला परवानगी द्या

आमदार डॉ देवरावजी होळी

आमदार डॉ देवरावजी होळी यांची मुख्यमंत्री ना एकनाथ जी शिंदे यांना निवेदनाद्वारे विनंती

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

राज्यातील विधवा परितक्त्या भगिनी ,अपंग, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना सरकारकडून देण्यात येणारे मासिक मानधन मागील ६ महिन्यांपासून मिळाले नसून प्रत्येक वेळेस असेच होत असल्याने अशा निराधार लोकांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते त्यामुळे या निराधारांना मायनस(-) बीडीएस च्या प्रणाली द्वारे मानधन देण्यासाठी परवानगी दिल्यास त्यांना दर महिन्याला वेळेवर मानधन मिळू शकेल. त्यामुळे या प्रणालीला परवानगी द्यावी अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
ना.देवेंद्र फडणवीसजी राज्याचे मुख्यमंत्री व सुधीर भाऊ मुनघंटीवार अर्थमंत्री असताना या प्रणालीच्या माध्यमातून अशा निराधारांचे मानधन देण्यात येत होते. त्यामुळे दर महिन्याला त्यांचे मानधन योग्य वेळेवर मिळत होते. मात्र महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर त्या प्रणालीचा वापर करणे बंद करण्यात आले परिणामी या निराधारांना आपल्या मासिक मानधनाकरिता ६-६ महिने वाट पहावी लागते. अतिशय निराधार निराश्रीत असलेल्या या निराधारांना दर महिन्याला आवश्यक असलेले मानधन ६-६ महिने मिळत नसल्याने त्यांचे जीवन जगणे कठीण झाले आहे .अशा निराधारांचा विचार करणे आवश्यक असून सत्तेत आलेल्या भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीच्या सरकारमध्ये लवकरच याबाबत निर्णय घेऊन अशा निराधारांना आधार द्यावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांची मुंबई मंत्रालयात भेट घेऊन निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
या मागणीच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मकता दर्शवित तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी असे निर्देश प्रधान सचिव यांना दिले.

Previous articleजिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून पूरपीड़िताना किट वाटप करण्यात आले..!!
Next articleसिलेंडरचे नवीन दर जाहीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here