Home युवा मराठा विशेष गुरुब्रह्मा गुरुविर्ष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।

गुरुब्रह्मा गुरुविर्ष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।

27
0

आशाताई बच्छाव

IMG-20220713-WA0023.jpg

गुरुब्रह्मा गुरुविर्ष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।

गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। माझे पहिले गुरु माझी आई आणि वडील !!दुसरे गुरु सतत खंबीरपणे पाठीशी असलेल्या काका आणि संपादक राजेंद्र पाटील राऊत यूवा मराठा न्यूज तिसरे गुरु माझे शाळेचे शिक्षक या सगळ्यांना गुरुपौर्णिमा निमित शुभकामना!🙏🏻

पण या सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली आई. कारण आपल्या जीवनात आपली आई ही सर्वात पहिली गुरु आहे. कारण अगदी गर्भ संस्कारापासूनच शिक्षणाची सुरुवात होते. आपले अपत्य आदर्श सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व बनावे यासाठी आई आपले सर्वस्व पणाला लावून अविरत कष्ट करत असते.
आईच्या उच्चारणाने मुलांना भाषेचं ज्ञान होतं. लहानपणी आईने सांगितलेल्या गोष्टी, दिलेली शिकवण, अनुभव हे मुलांच्या जीवनावर चिरस्थायी प्रभाव सोडतात. लहानपणी दिलेली शिकवण संपूर्ण जीवन त्याचे मार्गदर्शन करत असते.

मातृत्वाला पृथ्वीवर देवत्वाचे रूप प्राप्त आहे. आईचे प्रेम म्हणजे परमात्म्याचा प्रकाश आहे. जीवनाला योग्य वळण देण्यासाठी मार्गदर्शन देण्याचे कार्य आईच करते. म्हणूनच आई ही प्रथम गुरुस्थानी आहे. आई ही पहिली गुरु आणि विद्यापीठ आहे. त्यानंतर शिक्षक, आणि आध्यात्मिक गुरू.
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज बूलडाणा

Previous articleआधी गुरुसी वंदावे,मग साधन साधावे,गुरु म्हणजे माय बापं नाम घेता हरतील पापं
Next article!! आज गुरुपौर्णिमा !!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here