Home वाशिम अनसिंग येथील ग्रामीण रुग्णालय वाऱ्यावर

अनसिंग येथील ग्रामीण रुग्णालय वाऱ्यावर

171

आशाताई बच्छाव

IMG-20220620-WA0019.jpg

अनसिंग येथील ग्रामीण रुग्णालय वाऱ्यावर            वाशिम,(रितेश गाडेकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्)

अनसिंग येथील ग्रामीण रुग्णालयात वेळेच्या नंतरही डॉक्टर कर्मचारी नाही हजार, या ठिकाणी रुग्णांना आवश्यक सोयीसुविधा पुरेशा प्रमाणात नाहीत. या रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी नेहमी गैरहजर असतात, अशा अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. दरम्यान, शहरातील नागरिक सुरज ठाकरे व बबलू जाधव सोमवारी या रुग्णालयात गेले होते. रुग्णालयातील बहुतांशी अधिकारी, कर्मचारी गैरहजर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. डॉ.नाईक हे त्यांचा पुसद येतील स्वतः मालकीचा असलेल रुग्णालय चालवत असतात व ग्रामीण रुग्णालयात त्यांचं दुर्लक्ष असल्याचे पेशंटच्या बोलण्यावरून दिसून येत आहे. त्यांच्याकडे गेले की, एकही डॉक्टर हजर नाही आहेत असेच उत्तर कर्मचाऱ्यांकडून मिळते. सद्यस्थितीत हे ग्रामीण रुग्णालय आरोग्य यंत्रणेने रामभरोसे ठेवले आहे. ग्रामीण रुग्णालय सध्या समस्येचे आगार बनले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहे. मात्र इथे विविध सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे रुग्णांची प्रचंड हेळसांड होतेय.रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नाईक पूर्णवेळ हजर नसतात असे दिसून येत आहे.

Previous articleनांदेड येथील संध्याछाया वृद्धाश्रमात जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध व जनजागृती दिन कार्यक्रम संपन्न.
Next articleपुणेत युवा मराठा न्युज प्रतिनिधी प्रशांत नागणे यांच्या निवासस्थानी पितृदिन साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.