आशाताई बच्छाव
शेतकरी व लाभार्थ्यांना त्रास न होऊ देता कर्मचाऱ्यांनी समन्वयाने बँकेचे हित जोपासावे
– माजी आ. हणमंतराव पा बेटमोगरेकर
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड -अनेक अडचणीतून प्रामाणिक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठाम राहु पण यापुढे शेतकरी सभासद लाभार्थ्यांना त्रास न होऊ देता समन्वयाने जिल्हा बँकेचे हित जोपासावे असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा.आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी केले आहे.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके चे मुखेड तालुक्यातील गटसचिव, तपासणी अधिकारी आदींची बेटमोगरा येथे आज (दि.18) संचालक मा.आ.बेटमोगरेकर यांचे अध्यक्षतेत कर्जवसुली व वाटप आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की प्रत्येक कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणीत तुमच्या मागे मी भावासारखा ठाम राहीन पण शेतकरी, सभासद व लाभार्थी यांना त्रास किंवा गैरसोय सहन करणार नाही.सर्वाना सहकार्य व सन्मान देऊन समन्वयाने बँक फायद्यात आणा. यावेळी मुख्य तपासणी अधिकारी रावणगावकर यांनी तपशीलवार माहिती व आढावा घेतला तर याप्रसंगी प्रमुख उपस्थित काँग्रेस प्रदेश सचिव डॉ.श्रावण रॅपनवाड, खुशाल पाटील सावळे, चेरमन दत्ता माली पाटील, सरपंच नयूम दफेदार, बालाजी पोदार, आदींसह सर्व गटसचिव व तपासणी अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.