Home युवा मराठा विशेष प्रतिक्षा संपली! दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर

प्रतिक्षा संपली! दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर

26
0

आशाताई बच्छाव

IMG-20220616-WA0016.jpg

प्रतिक्षा संपली! दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर                                                             संग्रामपूर,(रविंद्र शिरस्कार शहर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 या कालावधीत घेण्यात आली होती.
परीक्षा संपल्यापासून विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल शुक्रवार दि.17 जुन 2022 ला दुपारी 1 वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहिर करण्यात येणार असल्याची बातमी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकतेच ट्वीटद्वारे कळविले आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी त्यांच्या बोर्ड परीक्षेच्या गुणपत्रिका डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

राज्यातून एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. मुख्य केंद्र आणि उपकेंद्र मिळून 21 हजार 384 ठिकाणी परीक्षा पार पडली. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका कधी मिळणार ते निकालादिवशी कळविण्यात येणार आहे.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध होतील. ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. अशी देखील माहिती देत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीटरवर व्हिडिओ शेअर करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पुढील संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल –

www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

Previous articleझाडीला विद्यार्थ्याचे डि.जे.लावून मिरवणूक काढून स्वागत!
Next articleहिंगणगाव ता. हातकणंगले हिंगणगाव येथील बौध्द समाजामध्ये तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here