Home नांदेड महावितरणाच्या अधिकाऱ्याला देगलूर भाजपचा घेराव.

महावितरणाच्या अधिकाऱ्याला देगलूर भाजपचा घेराव.

86
0

आशाताई बच्छाव

IMG-20220614-WA0062.jpg

महावितरणाच्या अधिकाऱ्याला देगलूर भाजपचा घेराव.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
काल दिनांक 14 जून रोजी शहरातील महावितरणाच्या कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टी च्या वतीने महावितरणाचा भोंगळ कारभाराच्या विरोधात “जबाब दो” निदर्शने करण्यात आली व अधिकाऱ्यांना निवेदन देऊन जाब विचारण्यात आला

प्रमुख मागण्या:-

१) ग्राहकांना संपर्क करण्यासाठी जो नंबर दिला आहे त्यावर परमानंद कर्मचाऱ्याचे 24तास बसण्यासाठी नियुक्ती करावी

२) पावसाळ्यापूर्वी देगलूर शहरातील व तालुक्यातील मंडळाचे काम तात्काळ पूर्ण करून विद्युत अखंडित ठेवावे

३) आपल्या कामचुकार बेजबाबदार कर्मचाऱ्यांमुळे ग्राहकांना नाहक त्रास होत आहे त्याचा फटका व्यापारी छोटे व्यापारी यांच्या व्यवसायावर होत आहे अशा कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी

४) विद्युत डीपी मधील पुढे चांगल्या दर्जाचे बसवून त्या डीपीला लाख बसवावा लाख नसल्यामुळे अनेक ठिकाणी जनावरे दगावत आहेत

५) देगलूर शहर व तालुक्यातील पोलवरील तारा लोंबकळत असल्यामुळे अपघात होत आहेत त्याची दुरुस्ती करण्यात यावी

६) देगलूर शहरातील वस्ती वाढ भागातील नवीन बसवण्यात आलेल्या खांबावर तारे लावून विद्युत पुरवठा सुरळीत करावे…

महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री चटलावार साहेबांनी तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी भाजपा जिल्हा चिटणीस शिवकुमार देवाडे, शहराध्यक्ष अशोक गंदपवार,मार्केट कमिटीचे उपसभापती रवी पाटील ,माजी नगरसेवक प्रशांत दासरवार , शहर सरचिटणीस गंगाधर दाऊलवार , युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, येरगीचे सरपंच संतोष पाटील, किनी गावचे सरपंच प्रतिनिधी सचिन पाटील ,शहर उपाध्यक्ष चिलवरवार सर , शहर उपाध्यक्ष बाबू भंडरवार , शहर उपाध्यक्ष राम कडलवार ,शहर कोषाध्यक्ष मनोज दोंतुलवार,तालुका उपाध्यक्ष नामदेव थडके ,तालुका कोषाध्यक्ष कैलास वंटे , संग्राम देगावकर , युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील ,युवा मोर्चा शहर सरचिटणीस सचिन कांबळे, शहर उपाध्यक्ष चंद्रकांत वावणाने ,शहर उपाध्यक्ष सौरव मधुरवार, सी.व्ही गुंडावार , अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अजीम अन्सारी, रज्जाक धुंदी सह अनेक व्यापारी , विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleखासगी शाळांचा मनमानी कारभार : पालकांनी तक्रारी करण्याचे आवाहन
Next articleवटपौर्णिमेचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री प.दे. येथे वडाच्या रोपाचे वृक्षारोपण.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here