Home गडचिरोली नगर परिषद गडचिरोली निवडणूक – 2022 चे आरक्षण आज जाहिर।

नगर परिषद गडचिरोली निवडणूक – 2022 चे आरक्षण आज जाहिर।

57
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220613-WA0013.jpg

नगर परिषद गडचिरोली निवडणूक – 2022 चे आरक्षण आज जाहिर।

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : 27 सदस्यसंख्या असलेल्या गडचिरोली नगरपरिषदेच्या आगामी 2022 च्या सार्वञिक निवडणुकिसाठी सदस्यांच्या आरक्षणाची सोडत आज 13 जून रोजी नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडली.यावेळी बालकांच्या हस्ते चिठ्ठी टाकुण आरक्षण सोडत काढण्यात आली.
यावेळी आरक्षण सोडतीसाठी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीचे प्रभारी उपविभागीय अधिकारी अंकित यांनी प्रधिकृत अधिकारी म्हणून काम पाहिले.तसेच यावेळी मुख्यधिकारी विशाल वाघ,कार्यालयीन कर्मचारी,पञकार , नागरीक,लोकप्रतीनिधी आधी उपस्थित होते.
गडचिरोली नगरपरिषदेची सदस्यसंख्या 27 असून त्यापैकी 14 जागा ह्या महिलांसाठी राखीव आहेत.त्यापैकी 10 जागा सर्व साधारण महिला प्रवर्गासाठी 2 अनूसुचीत जाती व 2 जागा अनूसुचीत जमाती महिला प्रवर्गासाठी राहाणार आहेत.सदर आरक्षण सोडतीवर हरकती व सुचना 15 ते 21 जून 2022 पर्यंत मुख्यधिकारी यांच्याकडे निवडणूक कार्यालय अथवा संबंधित प्रभाग कार्यालयाचे मुख्यालय येथे सादर करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here