Home अमरावती कृषीदुत पूर्वेश गायकवाड व योगेश निखाडे यांनी माती परिक्षणासंबंधी व बीज उगवण...

कृषीदुत पूर्वेश गायकवाड व योगेश निखाडे यांनी माती परिक्षणासंबंधी व बीज उगवण क्षमते बद्दल (नांदगाव पेठ) येथील शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

64
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220611-WA0110.jpg

कृषीदुत पूर्वेश गायकवाड व योगेश निखाडे यांनी माती परिक्षणासंबंधी व बीज उगवण क्षमते बद्दल (नांदगाव पेठ) येथील शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटील दांदळे

अमरावती:-पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला संलग्नित व पी. आर. पोटे पाटील एजुकेशनल अॅन्ड वेलफेयर ट्रस्ट व्दारा संचालीत पी. आर. पोटे पाटील कृषी महाविद्यालय, अमरावती येथील विद्यार्थी शेतकऱ्यांच्या जनजागृती करिता “ग्रामीण जागृक्ता कार्यानुभव” सन 2022 – 2023 (RAWE) या कार्यक्रमा अंतर्गत कृषिदूत म्हणून पुर्वेश गायकवाड व योगेश निखाडे यांनी नांदगाव पेठ तालुका अमरावती जिल्हा अमरावती येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन माती परिक्षणासंबंधी व बिज उगवन क्षमता चे गरज व फायदे यावर प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन प्रात्याक्षिके दाखविले त्यांच्या शेतातील मातीचा नमुना कसा घ्यावा व बियाण्यांची बिज उगवन क्षमता कशी निश्चित करावी याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली .
पी. आर. पोटे पाटील एजुकेशनल अॅन्ड वेलफेयर ट्रस्ट चे अध्यक्ष मा. श्री. प्रविणभाऊ पोटे पाटील, कृषि महाविद्यालयाचे संचालक डॉ. डी. टी. इंगोले व प्रभारी प्राचार्य, श्री. नितेश चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
विशेष उपस्थितीत श्री. प्रकाश खडसे श्री. अमोल दवाडे श्री. अक्षय खडसे श्री रणजीत गवळी श्री हकीम खान श्री मोहनसेठ मालपाणी ,श्री विनोद डांगे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. सदर प्रात्याक्षिकेच्या वेळी गावाचे ग्रामसेवक व कृषी सहाय्यक श्री.अनिकेत व. पुंड यांच्या उपस्थितीत व प्रा. श्वेता देशमुख, प्रा. सागर चौकसकर, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिके पार पडली. शेतकऱ्यांसाठी मोलाचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे नांदगाव पेठ शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here