Home नांदेड प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी विशाल पवार यांची निवड

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी विशाल पवार यांची निवड

47
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220611-WA0026.jpg

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी विशाल पवार यांची निवड

पत्रकार संघटनेकडून वाढदिवसानिमित्त अनोखी भेट

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी दैनिक महानगरी टाइम्स व दैनिक आनंद नगरी या वृत्तपत्राचे विशाल पवार यांची निवड करण्यात आली आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. संघाच्या नांदेड जिल्हा, मराठवाडा विभागावर उल्लेखनीय कामगिरी बजावली असल्याने त्यांची राज्य उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. विशाल पवार संघाच्या नियमांचे अधीन राहून, संघ बळकटीकरण व संघाची ध्येयधोरणे पूर्णत्वास नेण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत व करीत राहतील. त्यांच्या निवडीबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्कप्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य महिला संपर्क प्रमुख विजयाताई काचावार, राज्य महिला संघटक रिद्धी बत्रा, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनीष नेरुळकर, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, युवा प्रदेशाध्यक्ष प्रशांत राजगुरू, युवा संघटक सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रवीण राठोड, राज्य युवा संपर्क प्रमुख गणेश पवार, मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, महिलाध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी यांच्या एक मताने दिनांक 30 जून, 2023 पर्यंत ही निवड जाहीर करण्यात येत असून पुढील कार्य पाहून बढती दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Previous articleविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते लागु करा
Next articleमुखेड मतदारसंघात विकास तीर्थ मोटार सायकल रॅलीचे आयोजन.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here